Dhule News |इमर्जन्सी डायल '112' वर खोटी माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून चोप

म्हणे ज्योतिषाला मारहाण झाली, तत्काळ या
Police Dial 112
डायल '112' वर कॉल करुन एकाने पोलिसांना खोटी माहिती दिली. File Photo
Published on
Updated on

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील सतमाने गावच्या एका नागरिकाला तत्काळ पोलीस मदत क्रमांक 112 ला कॉल करुन पोलिसांना खोटी माहिती देऊन पोलिसांची मस्करी करणे चांगलेच अंगलट आले आहे.

Summary
  • त्याने 112 वर निजामपूर पोलीस स्टेशन येथे कॉल केला.

  • एका ज्योतीषाला काही लोक मारहाण करत आहे असे सांगितले.

  • आपण लवकर घटनास्थळी पोहचावे असे कळवले.

  • पोलिस चौकशीला गावात गेल्यावर काही घडले नसल्याचे तो म्हणाला.

  • पोलिसांनी खोटी माहिती दिल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

म्हणे चुकून कुणी कॉल केला असेल

भटू पंडितराव पदमोर (वय 30) रा. सतमाने ता.साक्री जि.धुळे याने पोलिसांना 112 वर कॉल केला. निजामपूर पोलीस स्टेशन येथे कॉल करुन पोलिसांना सांगितले की, एका ज्योतीषाला येथे काही लोक मारहाण करत आहे. आपण लवकर घटनास्थळी पोहचावे असे कळवले. त्याची खात्री करण्यासाठी तत्काळ निजामपूर पोलीस स्टेशनचे पोलिस रतन मोरे, पो.को.चव्हाण, पो.को दुरगुडे हे शासकीय वाहनाने सतमाने या गावी रवाना झाले. सतमाने गावात पोचल्यानंतर पोलिसांनी पंडितराव पदमोर याला भेटून विचारपूस केली. त्यावेळी त्याने पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे दिली. सांगितले की इथे कुठेच असे काही घडले नाही. चुकीने कोणी तरी कॉल केला असेल असे सांगितले.

Police Dial 112
Nashik : पोलिस भरतीसाठी येताना तरुणाचा अपघाती मृत्यू

प्रशासनाचा वेळ वाया घालविल्याने गुन्हा

त्या नंतर पोलिसांनी या घटनेची शहानिशा करून तपासणी कार्यासाठी गावातील पोलीस पाटील, सरपंच व दोन पंचांसह गावात जाऊन त्या घटनेची खात्री केली असता त्या गावात कोठेही असे काही झाले नाही. कॉलर ने डायल 112 वर खोटी माहिती दिल्याचे उघड झाले. प्रशासनाचा वेळ वाया घालविल्याने व खोटी माहिती पुरविल्याने भटू पंडितरावं पदमोर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, स.पो.नी गायकवाड, पो.स.इ विशाल पाटील, पो.स.इ कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. अशाप्रकारे खोटी माहिती देणाऱ्यावरती तत्काळ कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news