Wrestlers Protest : आंदोलक कुस्तीपटू कामावर रुजू झाल्याने खाप नेते नाराज | पुढारी

Wrestlers Protest : आंदोलक कुस्तीपटू कामावर रुजू झाल्याने खाप नेते नाराज

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Wrestlers Protest : भारतीय कुस्ती संघाचे (डब्ल्यूएआय) प्रमुख बृजभूषण शरण सिंह विरोधातील आंदोलन सुरू ठेवत कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया रेल्वेतील नोकरीवर पुन्हा रुजू झाले आहेत. पंरतु, जंतरमंतरवरील कुस्तीपटूंचे आंदोलन चिरडल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ आलेले शेतकरी तसेच खाप पंचायतचे नेते त्यांच्या या कृतीने नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे. कुस्तीपटूंच्या पाठीशी उभे राहण्यासाठी ९ जूनला जंतर-मंतरवर पुकारण्यात आलेले आंदोलन देखील खाप पंचायतने रद्द केल्याचे कळते आहे.

आंदोलक कुस्तीपटू आणि सरकारमध्ये थेट चर्चा सुरू झाली आहे. शनिवारी मध्यरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कुस्तीपटूंची भेट घेतली. त्यानंतर सोमवारी आंदोलनात पुढे असणारे कुस्तीपटू त्यांच्या रेल्वेतील नोकरीमध्ये रुजू झाले. यात साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांचा समावेश आहे. (Wrestlers Protest)

दरम्यान, केंद्र सरकार आणि कुस्तीपटू यांच्यातील चर्चेच्या फलश्रृतीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, असे शेतकरी नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कुस्तीपटूंसोबत सरकारने चर्चा करावी, अशी भूमिका शेतक-यांची होती. पण, अमित शहांसोबत कुस्तीपटूंनी भेट घेतली याची माहिती नव्हती, असे भारतीय किसान यूनियनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Wrestlers Protest)

आणखी वाचा :

Back to top button