आमिर खान प्रोडक्शन्सचा Happy Patel Khatarnak Jasoos Trailer रिलीज, व्हिडिओ पाहून क्रेझी व्हाल!

Happy Patel Khatarnak Jasoos Trailer | यंग, क्रेझी आणि फुल मजा, आमिर खान प्रोडक्शन्सचा ‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’चा ट्रेलर
Happy Patel Khatarnak Jasoos poster
Happy Patel Khatarnak Jasoos Trailer released instagram
Published on
Updated on
Summary

आमिर खान प्रोडक्शन्सचा Happy Patel: Khatarnak Jasoos या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून, त्याने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. ट्रेलरमध्ये स्पाय थ्रिलरला विनोदी टच देण्यात आला असून, हटके कथानक आणि भन्नाट प्रसंगांमुळे प्रेक्षक चित्रपटाबद्दल अधिक उत्सुक झाले आहेत.

Happy Patel Khatarnak Jasoos Trailer out

बॉलिवूडमध्ये आमिर खान प्रोडक्शन्सचा आणखी एक आगामी चित्रपट येत आहे. Happy Patel: Khatarnak Jasoos चित्रपटाचा नुकताच एक ट्रेलर रिलीज झाला आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्हीही क्रेझी व्हाल. Happy Patel: Khatarnak Jasoos हा एक स्पाय कॉमेडी चित्रपट आहे. यातील गुप्तहेराची भूमिका वेगळ्या अंदाजाकत असून ती वेगळ्या पद्धतीने सादर करण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये ‘हॅपी पटेल’ खतरनाक जासूस आहे. पण त्याची स्टाईल, व्यवहार, विनोदी शैली सर्वकाही खूपच अफलातून आहे.

Happy Patel Khatarnak Jasoos poster
Aneet Padda-Ahaan Panday Freindship - अनीत पड्डाने शेअर केली अहान पड्डा सोबतची पहिली भेट, उघड केल्या सिक्रेट गोष्टी

आमिर खान प्रोडक्शन्स नवी काहीतरी कथा घेऊन आला आहे. थ्री-इडियट्स, पीके यासारख्या चित्रपटांमध्ये अगदी वेगळ्या भूमिका साकारून आमिरने अभिनयाला वयाचं बंधन नाही, दाखवून दिलं आहे. या चित्रपटातील त्याची भूमिकाही वेगळी ठरलीय. या चित्रपटाचे दिग्दर्शन वीर दास यांनी केले आहे. चित्रपटात मोना सिंह महत्त्वाच्या भूमिकेत असून आता चित्रपट रिलीज होण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Happy Patel Khatarnak Jasoos poster
Akshaya Naik | अमृता खानविलकर नंतर सुंदरा फेम अक्षया नाईक तस्करीमध्ये! इम्रान हाश्मीसोबत झळकणार

या ट्रेलरमध्ये विनोदाचा फवारा, अनेक मजेशीर, हटके क्षण पाहायला मिळताहेत. फुल ऑन एंटरटेनमेंट चित्रपटात दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दुहेरी भूमिका वीर दास पार पाडणार आहे. त्याची फ्रेश कॉमेडी प्रेक्षकांना हसवायला तयार आहे.

काय आहे ट्रेलरमध्ये?

हॅपी पटेल: खतरनाक जासूसच्या ट्रेलरमध्ये वीर दास एका अगदी नव्या अंदाजात दिसतो. एक परफेक्ट आणि थोडासा इम्परफेक्ट जासूस, ज्याला एका मिशनवर निघायचे असते. तो अडचणीत सापडतो आणि मग सुरू होतो गोंधळ. त्याचा मजेशीर हा प्रवास आहे. मोना सिंह आपल्या रॉ अवताराने सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचते. तिने याआधी अशी भूमिका कधीही केलेल्या नसतात. मिथिला पालकर निरागस अभिनेत्री आहे. पण आपल्या चार्मने एक वेगळी रंगत ती आणते. आमिर खानचा पूर्णपणे वेगळा आणि अनोखा लूक कथेला आणखी एक जबरदस्त लूक कथेत रंग भरणारा आहे.

चित्रपट निर्मात्यांनी ट्रेलर शेअर करताना लिहिलं आहे-

“GAONWALONNNNN… तो एक शेफ आहे, तो एक एजंट आहे (थोडासा), तो एक हिरो आहे (कदाचित), आणि तो आहे HAPPY PATEL! भेटा आमच्या खतरनाक जासूसला-१६ जानेवारीपासून चित्रपटगृहात.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news