…त्यानंतर पुण्यातील पोटनिवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करणार : अजित पवार | पुढारी

...त्यानंतर पुण्यातील पोटनिवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करणार : अजित पवार

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : मागील निवडणुकीत कसबा मतदारसंघात आघाडीच्या वतीने जागा सोडली होती. त्यामुळे काँग्रेसने आता तयारी सुरू केली असेल. त्याचसोबत चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ८ ते १० लोकांनी उमेदवारी मागितली आहे. इच्छुक असलेल्या सर्वांना मी भेटणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठकीत पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुकाबाबत माझे मत मांडणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (दि.३१) दिली.

अजित पवार पुढे म्हणाले की, अदानी प्रकरणात सरकारने निवेदन देण्याची गरज आहे. विमा कंपनीचे या प्रकरणात नक्की किती पैसे अडकले आहेत, हे सरकारने स्पष्ट करावे. गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. महागाई वाढली आहे. यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच महाराष्ट्रला केंद्रीय अर्थसंकल्पातून योग्य निधी मिळावा, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button