इस्रायलमध्ये बेनेट सरकार अल्पमतात | पुढारी

इस्रायलमध्ये बेनेट सरकार अल्पमतात

तेल अवीव ; वृत्तसंस्था : सत्ताधारी आघाडीतील एका पक्षाने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने इस्रायलमधील पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांचे सरकार अल्पमतात आले आहे. आघाडीचे सरकार चालवणे कठीण काम आहे, दोन आठवड्यात खुर्ची जाऊ शकते, अशी प्रतिक्रिया बेनेट यांनी दिली आहे.

8 पक्षांच्या आघाडी सरकारमधील युनायटेड अरब लिस्ट पक्ष पॅलेस्टाईनबाबतच्या भूमिकेवरून बेनेट सरकारवर नाराज आहे. पॅलेस्टिनी राहत असलेल्या भागात ज्यूंना वसवले जात असल्याचा आरोप पक्षाने केला होता. त्यानंतर सोमवारी यामिना पक्षातील खासदार नीर ओरबाक यांनी आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली. त्यामुळे बेनेट सरकार अल्पमतात आले आहे. बेनेट यांनी अरब पक्षासमोर गुडघे टेकल्याचा आरोप ओरबाक यांनी केला आहे.

बेनेट सरकारकडे विरोधकांपेक्षा केवळ एक जागा जास्त होती. इस्रायलमध्ये दोन वर्षांत अल्पमतातील चार सरकारे सत्तेत येऊन गेली आहेत. माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे बेनेट यांचे राजकीय गुरू मानले जातात. त्यांना हटवून बेनेट पंतप्रधान बनले होते. माजी पंतप्रधान नेतान्याहू पुन्हा सरकार बनवू शकतात, अशा अटकळ असून त्यासाठी त्यांना केवळ दोन जागा लागणार आहेत.

Back to top button