

Tomorrow, the voters will decide the city's mayor.
खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा :
शहराच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचा ठरणारा दिवस उद्या उजाडत आहे. उद्या होणाऱ्या मतमोजणीतून शहराचा नगराध्यक्ष कोण ते ठरणार आहे. तसेच प्रभागनिहाय विकासाची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, याचा फैसला मतदार करणार आहेत. त्यामुळे केवळ उमेदवारच नव्हे, तर संपूर्ण शहराची नजर उद्याच्या निकालाकडे लागली आहे.
गेल्या २ तारखेला मतदारांनी आपला कौल मतदानयंत्रात बंद केला आहे. विकास, बदल, नेतृत्व आणि विश्वास या मुद्द्यांवर मतदारांनी कोणाला पसंती दिली, हे उद्याच्या निकालातून स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीकडे केवळ एक राजकीय प्रक्रिया म्हणून पाहिले जात नसून, शहराच्या पुढील पाच वर्षांच्या विकासाचा हा कौल मानला जात आहे.
रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि शहराच्या मूलभूत सुविधांबाबत कोण प्रभावी भूमिका बजावू शकतो, याचा विचार मतदारांनी केला असल्याचे चित्र आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये विकासकामांचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. अनेक ठिकाणी अपूर्ण कामे, रखडलेले प्रकल्प, तर काही भागात झालेली विकासकामे हेच प्रचाराचे मुख्य मुद्दे ठरले. त्यामुळे काम केले की नाही, या एकाच प्रश्नावर अनेक उमेदवारांची राजकीय परीक्षा झाली आहे.
तरुण नेतृत्वाचा उदय ?
या निवडणुकीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणावर तरुण उमेदवारांचे मैदानात उतरणे. अनेक तरुण प्रथमच नगरपालिकेत दाखल होण्याच्या तयारीत असून, त्यांनी ङ्गङ्घबदलफ्फ, ङ्गङ्घनवीन विचारफ्फ आणि पारदर्शक कारभारफ्फया मुद्द्द्यांवर प्रचार केला आहे. तरुण मतदारांमध्येही या तरुण उमेदवारांविषयी उत्सुकता दिसून आली. उद्याचा निकाल नव्या नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल करतो की अनुभवी चेहऱ्यांनाच संधी देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
निकालाची नागरिकांमध्ये उत्सुकता
उद्या सकाळी पार पडणार असून, सकाळी ११ वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निकाल जाहीर होताच शहराच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचे समर्थक, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. काही ठिकाणी विजयाचा आत्मविश्वास तर काही ठिकाणी चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.