Jalna crime news | मोहळई शिवारात विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू

Jalna crime news
Jalna crime news
Published on
Updated on

भोकरदन : तालुक्यातील मोहळई गावच्या शिवारात विहिरीत पडून ३० वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत महिलेचे नाव अर्चना रमेश शिंदे (वय ३०, रा. मोहळई, ता. भोकरदन, जि. जालना) असे आहे.

गुरूवारी (दि. १८) सायंकाळी सुमारे ४.५० वाजण्याच्या सुमारास (वेळ अंदाजे) मोहळई शिवारातील द्वारकाबाई शिंदे यांच्या शेतात (गट क्र. १२९) विहिरीत मृतदेह आढळून आला. संबधित महिलेचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

या घटनेची फिर्याद भागवत रामदास शिंदे (वय ४६, रा. मोहळई) दिनांक शुक्रवारी (दि. १९ डिसेंबर) सायंकाळी ५.३९ वाजता पारध पोलीस ठाण्यात दिली. अंत्यविधी पार पडल्यानंतर खबर देण्यात आल्याने तक्रार उशिरा दाखल झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यू क्रमांक ४२/२०२५, कलम १९४ बीएनएस अन्वये नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सदर नोंद पोहेकॉ/११३८ एस. सी. खिल्लारे यांनी केली असून पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news