Rajdhani Express Accident: राजधानी एक्सप्रेसने आठ हत्तींना उडवलं... रेल्वेचे इंजीनसह पाच डबे रूळावरून घसरले
Rajdhani Express Accident: सैरंग नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस आसामच्या होजई जिल्ह्यातून जात असताना आठ हत्तींना धडकली. या अपघातात आठ हत्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, या अपघातावेळी सैरंग - नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसचे इंजीनसह पाच डब्बे रूळावरून घसरले. त्यामुळे अनेक प्रवाशांना दुखापती झाल्या आहेत.
नॉर्थ-इस्ट फ्रंटियर रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की हा अपघात पहाटे २ वाजून १७ मिनिटांनी झाल्याचे सांगितले. नागाव डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर सुहास कदम यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार हा अपघात होजै जिल्ह्यातील चांगजुरै भागात झाला आहे. कदम आणि इतर वन अधिकारी माहिती समजल्या समजल्या घटनास्थळी रवाना झाले.
रेल्वे प्रशासनानं सांगितलं की या अपघातानंतर जमुनामुख कम्पूर भागातील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील सर्व रेल्वे सेवा या उत्तर प्रदेशच्या रेल्वे लाईनवरून वळवण्यात आल्या आहेत. दरम्यान, हा रेल्वे मार्ग सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याचे कदम यांनी सांगितले. सैरंग नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस मिझोरममधील सैरंग, ऐझावल भागाला नवी दिल्लीशी जोडते.

