

अनीत पड्डा आणि अहान पांडे यांची मैत्री सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनीतने एका मुलाखतीत अहानसोबतच्या पहिल्या भेटीचा अनुभव सांगत दोघांमधील बॉन्डिंग कसे तयार झाले, याचा खुलासा केला. पहिल्याच भेटीत सहज संवाद आणि सकारात्मक ऊर्जा यामुळे ही मैत्री पुढे अधिक घट्ट होत गेली, असे अनीतने सांगितले.
Aneet Padda-Ahaan Panday Freindship secret
बॉलिवूडमध्ये नव्या कलाकारांच्या मैत्री नेहमीच चर्चेत असतात. सध्या अभिनेत्री अनीत पड्डा आणि अभिनेता अहान पांडे यांची फ्रेंडशिप चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनीत पड्डाने अहान पांडेसोबतच्या पहिल्या भेटीबद्दल बोलताना काही खास आठवणी आणि सिक्रेट गोष्टी शेअर केल्या.
अनीतने सांगितले की, अहानची पहिली भेट अतिशय साधी पण लक्षात राहणारी होती. आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा कोणताही दिखावा नव्हता. तो खूपच सकारात्मक आणि मैत्रीपूर्ण स्वभावाचा आहे. पहिल्या भेटीतच दोघांमध्ये चांगले बोलणे झाले आणि एकमेकांशी सहजपणे बोलता आले, असे तिने सांगितले.
अहान पांडे आणि अनीत पड्डा जेव्हा पहिल्यांदा सैयारा चित्रपटासाठी भेटले तेव्हा त्यांना समजले देखील नाही की, त्यांची इतकी चांगली मैत्री होऊ शकते. त्यांची ऑनस्क्रिन दिसणारी केमिस्ट्री ही केवळ पडद्यापुरता मर्यादीत नव्हती. तर ती नैसर्गिकरित्या फुलली होती. पडद्यामागे त्यांच्यातील बॉन्डिंग इतके चांगले झाले होते, ज्यामुळे ऑनस्क्रिन देखील ती तितकीच सुंदर दिसली. अहान स्वतः म्हणतो, ''जेव्हा दोन लोक खरोखरच चांगले मित्र बनतात, तेव्हा ऑन‑स्क्रीन केमिस्ट्री प्लॅन करण्याची गरजच नसते, जे काही होतं, ते सहज आणि नैसर्गिकपणे होतं.''
अनीतने मैत्रीची सुरुवात कशी झाली, याबद्दल सांगितले की, सुरुवातीच्या दिवसांची आठवण आहे. मी जेव्हा आहानला पहिल्यांदा भेटले, तेव्हाच मला जाणवलं की, या व्यक्तीसोबत मी खूप कम्फर्टेबल राहणार आहे. तो खूपच मनमोकळा होता. जेव्हा ती पहिल्यांदा मोहित सूरी आणि आहानला एकत्र भेटली, तेव्हा ती खूप नर्व्हस होती. मी थोडी गोंधळत होते, माझे विनोद चालत नव्हते, आणि तो बिचारा तरीही हसत होता! पण त्या भेटीने काहीतरी खास सुरू झालं. त्याने गिटार वाजवला, आम्ही गाणी गायली, तो मला घरी सोडायला आला तेव्हा कारमध्ये खूप गप्पा मारल्या आणि तेव्हाच मला वाटलं की, हा माणूस खूपच छान आहे, त्याची एनर्जी खूप आवडली.
ती म्हणते, शूटच्या आधीच्या काही महिन्यांत आम्ही खूप चांगले मित्र झालो, खूप भेटलो, आमच्या शंका‑कुशंका, भीती शेअर केल्या. त्यामुळे सेटवर गेले तेव्हा मला खूप सुरक्षित आणि कम्फर्टेबल वाटलं, कारण आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे होतो.
सैयारा पुन्हा पाहता येणार
अहान आणि अनीतच्या चाहत्यांसाठी सुखद वृत्त म्हणजे सैयाराचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २० डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता सोनी मॅक्सवर पाहता येणार आहे.