बारावीत यंदा प्रज्ञावंत घटले; गेल्यावर्षीच्या तुलनेत एवढ्या टक्क्यांनी निकाल घटला | पुढारी

बारावीत यंदा प्रज्ञावंत घटले; गेल्यावर्षीच्या तुलनेत एवढ्या टक्क्यांनी निकाल घटला

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बारावीची यंदा 100 टक्के अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्यात आली होती आणि कोरोना प्रादुर्भावादरम्यान दिलेल्या सवलती रद्द करण्यात आल्या होत्या. त्याचा थेट परिणाम बारावीच्या निकालावर झाला. गेल्यावर्षीच्या तुलनेत 2.97 टक्क्यांनी निकाल घटला. त्याचबरोबर गेल्यावर्षी 10 हजार 47 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते. यंदा मात्र 7 हजार 693 विद्यार्थ्यांनाच हा टप्पा पार करता आला. त्यामुळे उत्तीर्णांबरोबरच प्रज्ञावंतदेखील या वर्षी घटल्याचे स्पष्ट झाले आहे. निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे दिसत आहे.
  • राज्याचा बारावीचा निकाल 91.25 टक्के
  • सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा, तर सर्वांत कमी निकाल मुंबई विभागाचा

असा घसरला गुणवंतांचा टक्का

गेली तीन वर्षे 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. 2020 मध्ये 83 हजार
262 विद्यार्थ्यांना, 2021 मध्ये 1 लाख 4 हजार 633 विद्यार्थ्यांना, तर गेल्या वर्षी 10 हजार 47 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते. यंदा मात्र केवळ 7 हजार 696 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. तशीच परिस्थिती 75 आणि 60 टक्के गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची आहे. त्यामुळे यंदा उत्तीर्णांबरोबरच प्रज्ञावंतांचा टक्कादेखील घटल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 2.97 टक्के निकाल घटला असल्याचे दिसत आहे. परंतु गेल्या वर्षी विविध सवलती देण्यात आल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या निकालाची तुलना गेल्या वर्षीच्या निकालाशी न करता 2020 च्या निकालाशी करणे आवश्यक आहे. 2020 आणि 2023 मध्ये झालेली परीक्षा सारखीच होती. त्यामुळे 2020 च्या निकालाची 2023 च्या निकालाशी तुलना करता यंदा निकालात 0.59 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर मुलींच्या निकालात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
                                                      – शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ.

गुणपडताळणी, छायाप्रतीबाबत..

राज्य मंडळातर्फे विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येईल. गुणपडताळणीसाठी 26 मे ते 5 जून या कालावधीत, छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून या कालावधीत अर्ज करता येईल. यासाठी शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच भरावे लागेल. त्या बाबतची माहिती हीींिीं:/र्/ींशीळषळलरींळेप.ाह-हील.रल.ळप/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आधी छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी विभागीय मंडळाकडे अर्ज करणे आवश्यक आहे

Back to top button