KEM Mumbai|केईएम रुग्णालयात कमी खर्चात व्हेरिकोज व्हेन्सवर उपचार

लॅप्रोस्कोपी तंत्राद्वारे व्हेरिकोज व्हेन्सच्या गंभीर आजारावर उपचार
KEM Mumbai
व्हेरिकोज व्हेन्सच्या गंभीर आजारावर उपचारFile Photo
Published on
Updated on

महापालिकेच्या केईएम रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना आता लॅप्रोस्कोपी तंत्राद्वारे व्हेरिकोज व्हेन्सच्या गंभीर आजारावर उपचार करण्याची सुविधा मिळणार आहे. येथे व्हॅस्क्युलर ओपीडी सुरू करण्यात आली आहे. शिवाय खासगी रुग्णालयांच्या तुलनेत कमी खर्चिकही असल्याने रुग्णांना फायदा होणार आहे.

KEM Mumbai
Maharashtra Election | पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर, १० जूनला मतदान

व्हेरिकोज व्हेन्सच्या गंभीर आजारावर उपचार

या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये कलर डॉपलर केले जाते. रुग्णांच्या आजाराचे स्वरूप पाहून त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. आतापर्यंत केल्या जात असलेल्या शस्त्रक्रियांमध्ये, रुग्णांना भूल दिली जात होती. यानंतर, पायाच्या वरच्या भागात एक चीर देऊन प्रभावित शिरा काढून टाकल्या जात होत्या. ही प्रक्रिया केवळ गुंतागुंतीची नाही तर रुग्णांसाठी वेदनादायकदेखील होती.

आता अत्याधुनिक लेप्रोस्कोपी तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांवर कोणतीही चीर न लावता उपचार केले जातील. ही संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होते. यामध्ये रुग्णाला कोणतीही अडचण येत नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रुग्णाला एक-दोन दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळतो आणि तो सामान्यपणे काम करू लागतो.

KEM Mumbai
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान

केईएममध्ये उपचारासाठी 22 हजारांचा खर्च

खासगी रुग्णालयांमध्ये लेझर तंत्रज्ञानाच्या मदतीने उपचारासाठी सुमारे 80 ते एक लाख रुपये खर्च येतो, तर महापालिकेच्या केईएम रुग्णालयात अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो. अशा आजारांच्या तक्रारी घेऊन दररोज सुमारे चार रुग्ण रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये पोहोचत असल्याचे विभागातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यामध्ये दिसणार्‍या लक्षणांच्या आधारे शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जातो.

KEM Mumbai
नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते अरविंद शहापूरकर यांचे निधन

ओपीडीची वेळ

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत ओपीडी सुरू असते. यामध्ये ओपीडी, आयपीडीचे रुग्ण उपचारासाठी येतात. अशा परिस्थितीत या शस्त्रक्रियेसाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news