7 years imprisonment, fine of Rs 10 lakh for using artificial color in kebabs
गोबी मंच्युरियन, बॉम्बे मिठाईप्रमाणेच आता कबाबमध्ये अनैसर्गिक रंगाच्या वापरावर बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. Kabab File Photo

कबाबमध्ये कृत्रिम रंग वापरल्यास ७ वर्षे शिक्षा, १० लाख दंड

कर्नाटक सरकारचा निर्णय
Published on

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : गोबी मंच्युरियन, बॉम्बे मिठाईप्रमाणेच आता कबाबमध्ये अनैसर्गिक रंगाच्या वापरावर बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास सात वर्षांचा कारावास आणि 10 लाखांचा दंड अशी शिक्षा देण्यात येणार आहे.

याबाबतचे परिपत्रक शुक्रवारी (दि. 21) जारी करण्यात आले आहे. गोबी मंच्युरियन, बॉम्बे मिठाई, कबाब आकर्षक दिसण्यासाठी त्यामध्ये कृत्रिम रंगांचा वापर केला जातो. पण, अशा रंगांमध्ये मानवी शरीरासाठी हानिकारक असणार्‍या रसायनांचा समावेश असतो. या रसायनांमुळे कर्करोगाचा धोका संभवतो. याबाबतचे वृत्त अनेकदा प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले होते. काही वृत्तपत्रांनी याचा पाठपुरावा केला होता. याबाबत सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून कबाबमध्येही कृत्रिम रंगाच्या वापरावर बंदीचा आदेश जारी केला आहे.

7 years imprisonment, fine of Rs 10 lakh for using artificial color in kebabs
Dailyhunt Trust of Nation Survey : पंतप्रधान म्हणून 64 टक्के लोकांची नरेंद्र मोदींनाच पसंती

राज्यातील विविध ठिकाणांहून कबाबचे एकूण 39 नमुने संग्रहित करण्यात आले होते. प्रयोगशाळेत त्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 8 नमुन्यांमध्ये कृत्रिम रंग (सात नमुन्यांमध्ये सनसेट यलो एका नमुन्यात कार्वोसिन) वापरण्यात आल्याचे दिसून आले. अन्नसुरक्षा आणि दर्जा कायदा 2006 मधील नियमांनुसार मानवी आरोग्यासाठी हे कृत्रिम रंग धोकादायक आहेत. त्यामुळे अशा रंगांवर बंदी घालण्यात आली आहे.

7 years imprisonment, fine of Rs 10 lakh for using artificial color in kebabs
National Education Policy: आता सेवाज्येष्ठता विसरा, शिक्षकांना परफॉर्मन्सवर पदोन्नती; बदल्याही बंद होणार

अन्नसुरक्षा आणि दर्जा खात्याच्या आयुक्तांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. कोणत्याही प्रकारच्या कबाबमध्ये कृत्रिम रंगांचा वापर करण्यावर बंदी आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. संबंधितांना सात वर्षे शिक्षा आणि 10 लाखांचा दंड ठोठावला जाऊ शकतो, असे परिपत्रकात म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news