Stock Market Updates |सेन्सेक्सचा नवा विक्रमी उच्चांक! निफ्टी २३,७०० पार

कालच्या ७८,१६४ च्या विक्रमी उच्चाकांची पातळी ओलांडली
BSE Sensex
सेन्सेक्सने सुरुवातीच्या व्यवहारात ७८,१८९ अंकांला स्पर्श केला. file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क

मंगळवारच्या सत्रात २३,७५४ चा विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर निफ्टीने बुधवारी (दि.२६) सपाट पातळीवर सुरुवात केली. निफ्टी २३,७०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर सेन्सेक्सने सुरुवातीच्या व्यवहारात कालच्या ७८,१६४ च्या विक्रमी उच्चाकांची पातळी ओलांडली. सेन्सेक्सने सुरुवातीला ७८,१८९ अंकांला स्पर्श केला. सकाळी १०.३० वाजता सेन्सेक्स ७८,१०० च्या पातळीवर व्यवहार करत होता.

विशेषतः स्मॉलकॅप शेअर्सची चांगली कामगिरी दिसून येत आहे. ऑटो, बँक, मेटल, फार्मा, FMCG मध्ये विक्री तर मीडिया शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे.

BSE Sensex
Stock Market Closing Bell | सेन्सेक्स, निफ्टी नव्या विक्रमी उच्चांकावर बंद

जागतिक बाजारातून संमिश्र संकेत

काल मंगळवारी सेन्सेक्स ७१२ अंकांनी वाढून ७८,०५३ वर तर निफ्टी १८३ अंकांच्या वाढीसह २३,७२१ बंद झाला होता. आज बुधवारी जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळाल्यानंतर देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात सपाट झाली.

'या' शेअर्सवर विक्रीचा दबाव

निफ्टीवर अल्ट्राटेक, ग्रासीम, श्रीराम फायनान्स, कोटक बँक, LTIMindtree हे शेअर्स तेजीत आहेत. हिंदाल्को, टाटा स्टील, बजाज ऑटो, एम अँड एम, अपोलो हॉस्पिटल या शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून येत आहे. निफ्टी बँक, निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेसमध्ये घसरण झाली आहे.

BSE Sensex
ऐतिहासिक टप्प्यावर भारतीय शेअर बाजार

सेन्सेक्सवर अल्ट्राटेक सिमेंट, कोटक बँक, रिलायन्स, अदानी पोर्ट्स, एलटी, हिंदुस्तान युनिलिव्हर या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. तर टाटा स्टील, एम अँड एम, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक हे शेअर्स घसरले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news