धुळे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यात पहिल्या दोन तासात 10. 31 टक्के मतदान झाले आहे. धुळ्यातील देवपूर परिसरातील मतदान केंद्रांची जिल्हाधिकारी अभिनव गोयल आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
धुळे जिल्ह्यामध्ये 12 मतदान केंद्र
सकाळी सात ते नऊ वाजे दरम्यान 662 पुरुष मतदार तर 179 महिला मतदार अशा एकूण 841 मतदारांनी मतदाराचा मतदानाचा हक्क बजावला
मतदान केंद्राची जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पाहणी केली
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहमदनगर याप्रमाणे पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी 21 उमेदवार आपले भाग्य आज बुधवार (दि.26) रोजी आजमावत आहेत. यात मावळते आमदार किशोर भिकाजी दराडे हे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून, ॲड. संदीप गोपाळराव गुळवे हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून, ॲड. महेंद्र मधुकर भावसार हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून उमेदवारी करीत रींगणात उभे आहेत. या शिवाय समता पार्टीकडून धोंडीबा भागवत यांच्यासह 17 अपक्ष उमेदवार रिंगणात लढा देत आहेत. या निवडणुकीत महायुतीमध्ये एकमत न झाल्याने महायुतीतून दोन उमेदवार समोर आले आहेत.
दरम्यान आज मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्तात मतदान सुरळीतपणे पार पडत आहे. धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या मतदान केंद्राची जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पाहणी केली. या प्रसंगी पोलीस आणि संबंधित विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते.
धुळे जिल्ह्यामध्ये 12 मतदान केंद्र असून एकूण 8159 मतदार आहेत. यात 6 हजार 203 पुरुष तर १९५६ महिला मतदार आहेत. यातून सकाळी सात ते नऊ वाजे दरम्यान 662 पुरुष मतदार तर 179 महिला मतदार अशा एकूण 841 मतदारांनी मतदाराचा मतदानाचा हक्क बजावला. या पहिल्याच दोन तासात 11 टक्के पुरुष, 9 टक्के महिला अशा 10.31 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.