सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पुरस्कार जाहीर | पुढारी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पुरस्कार जाहीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून दरवर्षी देण्यात येणार्‍या विविध पुरस्कारांची घोषणा विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी प्रजासत्ताक दिनाला केली. या पुरस्कारांचे वितरण 10 फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या वर्धापनदिनाला करण्यात येणार आहे. या वर्षीचा कलाक्षेत्रातील युवापुरस्कार अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला जाहीर झाला आहे. तर क्रीडाक्षेत्रातील पुरस्कार प्रीयेशा देशमुखला, संशोधनातील पुरस्कार डॉ.रणजित काशिद यांना, तर समाजकार्यातील पुरस्कार डॉ. अमोल वाघमारे यांना जाहीर झाला आहे.

याव्यतिरिक्त जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम शहरीविभाग डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी यांना जाहीर झाला आहे. ग्रामीण भागातील पुरस्कार डॉ.जे.डी.पवार कॉलेज ऑफ फार्मसी, नाशिक यांना जाहीर झाला आहे. अव्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शहरी विभागातील पुरस्कार एस. व्ही.के. टी. महाविद्यालय, नाशिक यांना जाहीर झाला आहे. तर ग्रामीण भागातील पुरस्कार विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, बारामती यांना जाहीर झाला आहे.

उत्कृष्ट विद्यापीठ विभाग पुरस्कार सूक्ष्मजीवशास्त्र विभागाला जाहीर झाला आहे. उत्कृष्ट नावीन्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी पुरस्कार डॉ. अश्विनी देशपांडे, डॉ. माधुरी जावळे, डॉ. चारुशीला पाटील यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट संशोधन पुरस्कार विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. पूजा दोशी यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार डॉ. रजनीश स्वाती बार्नबस व डॉ. सुभाष अहिरे यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट संचालक, शारीरिक शिक्षण व क्रीडापुरस्कार डॉ. आशा बेंगाळे यांना व डॉ.दत्तात्रय शिंपी यांना तर आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अध्यापक पुरस्कार डॉ. रवींद्र चौधरी यांना जाहीर झाला आहे.

उत्कृष्ट प्राचार्य/ संचालक पुरस्कार डॉ. केशव नांदुरकर, डॉ. अदिशेशैया मेडा, डॉ. बापू जगदाळे, डॉ. पंडित शेळके यांना जाहीर झाला आहे. तर उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार डॉ.विनय कुलकर्णी, डॉ. योगिनी बोरोले, डॉ. राजश्री पटवर्धन, डॉ. मनोज पाटील यांना जाहीर झाला आहे, असे डॉ.सोनवणे यांनी सांगितले.

Back to top button