पुढारी वृत्तसेवा
अंकशास्त्रामध्ये मूलांक १ हा अत्यंत शुभ आणि नेतृत्वाचा अंक मानला जातो. हा अंक सूर्य ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो, जो आत्मविश्वास, सन्मान, नेतृत्व आणि यशाचा कारक आहे.
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक १ असतो.
असे लोक जन्मतःच महत्त्वाकांक्षी, स्वतंत्र आणि दृढनिश्चयी असतात. त्यांच्यावर सूर्याची विशेष कृपा असते, त्यामुळे आयुष्यात उशिरा का होईना, पण त्यांना मोठे यश आणि भरपूर मानसन्मान मिळतो.
हे लोक जिथे जातात तिथे आपली वेगळी ओळख निर्माण करतात.
मूलांक १ असलेल्या लोकांमध्ये जन्मजात नेतृत्वाचा गुण असतो. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास ठासून भरलेला असतो.
ते स्वतंत्र विचारांचे, प्रामाणिक आणि धाडसी असतात. सूर्याच्या कृपेमुळे त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक आणि प्रभावशाली असते.
सूर्य हा राजेशाही ग्रह आहे. मूलांक १ च्या व्यक्तींना सुरुवातीच्या आयुष्यात संघर्ष करावा लागू शकतो, परंतु एकदा यश मिळाले की ते मागे वळून पाहत नाहीत.
हे लोक सरकारी नोकरी, राजकारण, प्रशासन, व्यापार, चित्रपट, क्रीडा किंवा नेतृत्वाच्या क्षेत्रांत मोठे नाव कमावतात. अनेक मोठे नेते, अधिकारी, उद्योगपती आणि कलाकार याच मूलांकाचे आहेत.
प्रेमाच्या बाबतीत मूलांक १ चे लोक अतिशय रोमँटिक आणि एकनिष्ठ असतात. ते आपल्या जोडीदाराचा खूप आदर करतात. त्यांचे वैवाहिक जीवन सुखी असते.
मुलींसाठी हा अंक विशेष शुभ मानला जातो, कारण त्यांचे लग्न उच्च घराण्यात होते आणि सासरी त्यांना खूप मानसन्मान मिळतो.
आरोग्याच्या बाबतीत यांना डोके, डोळे, हृदय किंवा हाडांच्या समस्या जाणवू शकतात.