

New Year 2026 Vastu Tips
नवी दिल्ली : प्रत्येकजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहे. २०२५ हे बहुतेक लोकांसाठी चांगले वर्ष नव्हते. हे वर्ष मंगळाचे असल्याने अनेकांवर त्याचा प्रभाव पडला. आता प्रत्येकाला वाटत की, २०२६ वर्षात सर्वकाही चांगल घडूदे. मात्र, यासाठी तुम्ही स्वतः काही गोष्टी करणे महत्वाचे आहे. जर तुम्हालाही नवे वर्ष आयुष्यात नवीन संधी आणि प्रगती घेऊन यावे, असे वाटत असेल, तर त्यासाठी घराची वास्तू योग्य असणे आवश्यक आहे. वास्तू शास्त्रानुसार नवीन वर्षाच्या आधी तुमच्या घरातून कोणत्या वस्तू काढून टाकाव्या ते जाणून घ्या.
१. नवीन वर्षाच्या आधी, तुमच्या घरातून जुने आणि जीर्ण झालेले बूट आणि चप्पल काढून टाका. वास्तुनुसार, या वस्तू घरात ठेवल्याने नकारात्मकता येते. शिवाय, त्यांची नकारात्मक ऊर्जा पूर्ण झालेले कोणतेही काम खराब करू शकते. गरजू व्यक्तीला ते दान करणे किंवा फेकून देणे चांगले.
२. बंद पडलेले घड्याळ: घरात कधीही बंद पडलेले घड्याळ ठेवू नये. तुम्ही ते वेळेत दुरुस्त करून घेऊ शकता, पण बंद किंवा खराब घड्याळ घरात ठेवू नका. असे केल्याने नशिबाची साथ मिळणे थांबते. याच्या ऊर्जेमुळे आयुष्यात तणाव वाढू लागतो आणि कामांमध्ये अडथळे निर्माण होतात. म्हणूनच नवीन वर्षाच्या आधी ते घराबाहेर काढावे.
३. तुटलेली काच: लोक अनेकदा त्यांच्या घरात तुटलेली काच बराच काळ ठेवतात. ती घरात ठेवणे खूप अशुभ मानले जाते. वास्तुनुसार, तुटलेली काच घरात नकारात्मक ऊर्जा आणते आणि घराची शांती आणि आनंद भंग करते. नवीन वर्ष येण्यापूर्वी ती बाहेर फेकून देणे चांगले.
४. सुकलेली झाडे-रोपे: हिवाळ्यात काही झाडे सुकू लागतात. बरेच लोक या वाळलेल्या झाडांना कुंड्यांमध्ये ठेवतात या आशेने की ती पुन्हा जीवंत होतील. लक्षात ठेवा की वास्तुनुसार, अशा झाडांमुळे वास्तुदोष निर्माण होतात. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी अशा झाडांना घरातून काढून टाकावे.
५. देवाच्या तुटलेल्या मूर्ती किंवा फाटलेले फोटो: देवघरात देवाच्या तुटलेल्या मूर्ती चुकूनही ठेवू नयेत. तसेच, देवाचे फाटलेले फोटो देखील लावू नका. यामुळे घरातील सर्वांच्या आयुष्यावर वाईट प्रभाव पडतो.
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असल्याचा दावा आम्ही करत नाही. अधिक माहितीसाठी कृपया वास्तूशास्त्र तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)