Dhurandhar BO Collection | बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'चा तडका; १३ दिवसांत ५०० कोटींच्या क्लबमध्ये होणार एन्ट्री; Fa9la गाण्याचा गायक म्हणाला...

Dhurandhar BO Collection | बॉक्स ऑफिसवर धुरंधरचा तडका; १३ दिवसांत ५०० कोटींच्या क्लबमध्ये होणार एन्ट्री; ट्रेंडींग Fa9la गाण्याचा गायकाची पहिली प्रतिक्रिया
Dhurandhar film poster
Dhurandhar Box Office Collection instagram
Published on
Updated on
Summary

धुरंधर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला असून अवघ्या १३ दिवसांत ५०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याची तयारी सुरू आहे. चित्रपटातील ट्रेंडिंग Fa9la गाण्यालाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून, या यशावर गायकाने भावना व्यक्त केल्या आहेत.

Dhurandhar Box Office Collection latest update

बॉक्स ऑफिसवर सध्या एकच नाव गाजत आहे ते म्हणजे ‘धुरंधर’. प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. रणवीर सिंह आणि अक्षय खन्नाच्या धुरंधरने बॉक्स ऑफिसवर वादळ आणले आहे. जवळपास दोन आठवड्यानंतर कोटींचा बिझनेस केला आहे. कमाईच्या बाबतीत अवघ्या १३ दिवसांत ५०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करण्याच्या उंबरठ्यावर ‘धुरंधर’ पोहोचला आहे.

Dhurandhar film poster
Kumar Sanu-Rita Bhattacharya| बॉलीवूडच्या प्रसिद्ध गायकाचा कोर्टात लढा, एक्स पत्नीवर ठोकला मानहानीचा खटला, मागितली ३० लाखांची नुकसान भरपाई

धुरंधर रिलीज होऊन १३ दिवस झाले आहेत. आणि १३ व्या दिवशी या चित्रपटाने कोटींची कमाई केली आहे. रिपोर्टनुसार, १३ व्या दिवशी चित्रपटाने २५.५० कोटी रुपयांचा बिझनेस केला आहे. घरगुती बॉक्स ऑफिसवर एकूण ४३७.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट आता ब्लॉकबस्टर ठरला आहे.

Dhurandhar film poster
KGF 2 Co-Director Kirtan Nadagouda Son Death : हृदय पिळवटून टाकणारी घटना! लिफ्टमध्ये अडकल्याने सह-दिग्दर्शकाच्या मुलाचा मृत्यू

भारतात आतापर्यंतचे कलेक्शन ४५४.२० कोटी झाले आहे. धुरंधरने बाहुबली ४२१ कोटींच्या नेट कलेक्शनला देखील मागे टाकले आहे. आता पुढील लक्ष्य गदर २ असून गदरने भारतात ५२५ कोटींची कमाई केली होती.

वर्ल्डवाईड कलेक्शन

धुरंधरने वर्ल्डवाईड ६६४ कोटींचा गल्ला जमवला आङे. ट्रेड ॲनालिस्टनुसार, चित्रपट लवकरच ७०० कोटींमध्ये पोहोचेल. हा विकेंडला धुरंधरची टक्कर अवतार: फायर अँड एश (Avatar: Fire and Ash) शी होणार आहे.

Fa9la गाण्याचा गायक म्हणाला...

बॉक्स ऑफिस ते मोबाईलपर्यंत केवळ एकच धून ऐकू येतेय, ती म्हणजे धुरंधर चित्रपटातील अक्षय खन्नाच्या गाण्याची. बहरीन रॅपर Flipperachi ने अक्षय खन्नावर चित्रीत करण्यात आलेले गाणे Fa9la गायले आहे. हे अरबी गाणे इतके ट्रेंडिंग आणि व्हायरल होईल, असे गायकाला वाटले नव्हते. त्याची खास प्रतिक्रिया समोर आलीय. तो म्हमाला की, धुरंधर चित्रपटामुळे इतिहास रचला गेला आहे. त्याने कधीच विचार केला नव्हता की, हे गाणे इतके फेमस होईल. अरबी बोल असताना देखील गाणे सर्वांच्या पसंतीस उतरले आहे.

त्याने पुढे सांगितले की, चित्रपटाचे निर्माते आले. त्यांनी हे गाणे निवडले आणि बस जे नंतर घडलं, तो इतिहास आहे. खंर सांगायचं तर इतकी लोकप्रियतेची अपेक्षा नव्हती. लोक माझे बोल (लिरिक्स) व्यवस्थितपणे समजू शकत नाहीत. पण धून दमदार आहे आणि कमालीची गोष्ट म्हणजे लोकांवर गाण्याचा प्रभाव आहे. त्यांच्यावर खोल प्रभाव पडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news