cement drum facebook post| फेसबुकवर पत्नीची 'सिमेंट अन् ड्रम'ची धक्कादायक पोस्ट; रहस्य उलगडताच पतीच्या पायाखालची जमीनच सरकली!

cement drum facebook post case | देशाला हादरवून सोडणाऱ्या मेरठमधील भीषण हत्याकांडाची आठवण ताजी
AI-generated image
प्रातिनिधिक फोटो.Pudhari Photo.
Published on
Updated on

cement drum facebook post case

बुलंदशहर : पती, पत्नी, प्रियकर आणि निळा ड्रम, या शब्दांनी मार्च २०२५ म्हणजे एक वर्षापूर्वी उत्तर प्रदेशसह देशाला हादरवून सोडलं होतं. प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीच्या हत्या करून निळ्या ड्रममध्ये मृतदेहाचे तुकडे लपवलेल्‍या मेरठमधील भयंकर गुन्‍ह्याची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे. कारण बुलंदशहरमधील पतीला पत्नीच्या मोबाईलमधील सिमेंट आणि ड्रमने इतकं हादरवून सोडलं की, त्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पत्नीला तिच्या प्रियकरासोबत जाण्याची परवानगी दिली आहे.

पती, सहा महिन्यांच्या बाळाला सोडून पत्नी गेली प्रियकराकडे

राजकुमारने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या पत्नीचे गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध सुरू होते. ती वारंवार त्याच्याशी वाद घालून प्रियकराला भेटायला जात असे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ती आपल्या सहा महिन्यांच्या बाळाला आणि पतीला सोडून माहेरी जाते असे सांगून निघून गेली होती. मात्र, प्रत्यक्षात ती महिनाभर तिच्या प्रियकरासोबत राहत होती, असा दावा राजकुमारने केला आहे.

AI-generated image
Lucknow Horror: धक्कादाक! NEET वरून वाद; मेरठ प्रकरण वाचलं... २१ वर्षाच्या मुलानं बापाचे हात - पाय तोडले, निळ्या ड्रममध्ये घातले

फेसबुक पोस्टने उघड केलं षड्यंत्र

नुकतेच त्याची पत्नी फोनवर (कथितरित्या प्रियकराशी) बोलत असताना राजकुमारने तिचा फोन हिसकावून घेतला. यानंतर सत्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. फोन तपासत असताना त्याला काही आक्षेपार्ह फोटो आणि फेसबुकवर शेअर केलेल्या हत्येच्या कथा आढळल्या. त्या पोस्टवर "सिमेंट और ड्रम" असे कॅप्शन होते. इतकेच नाही तर, राजकुमारचा स्वतःचा फोटो असलेल्या एका पोस्टवर "नीला ड्रम और सिमेंट" (निळा ड्रम आणि सिमेंट) असे लिहिलेले होते. हे पाहून आपली हत्या करण्याचा कट रचला जात असल्याचा संशय राजकुमारला आला.

AI-generated image
Shocking Crime News: लाँग ड्राईव्ह वेळी झाला वाद... CA ने पत्नीचा थेट कात्रीनंच गळा चिरला... पोलिसांनी १८ तासात कसा छडा लावला?

मेरठमधील हत्याकांडाची आठवण

"निळा ड्रम आणि सिमेंट" या शब्दांमुळे मार्च २०२५ मधील एका भीषण हत्याकांडाची आठवण ताजी झाली. त्यावेळी मुस्कान रस्तोगी नावाच्या महिलेने तिच्या प्रियकरासह मिळून पतीची हत्या केली होती आणि मृतदेहाचे १५ तुकडे करून ते मेरठमधील एका घरात सिमेंटने भरलेल्या निळ्या ड्रममध्ये लपवले होते. राजकुमारच्या पत्नीनेही वादादरम्यान त्याला अनेकदा 'तुला निळ्या ड्रममध्ये भरून टाकेन' अशी धमकी दिली होती.

AI-generated image
Shocking Train Incident |भयंकर... पोटच्‍या मुलीला आईने रेल्‍वेसमोर ढकलले, 'तिला वाचवू नका' म्हणत मदत करणार्‍यांनीही रोखले!

'माझ्या भावांनाही जीवे मारण्याची दिली धमकी'

राजकुमार म्हणाला, "ती मला वारंवार जीवे मारण्याची धमकी द्यायची. मी तिचा फोन काढून घेतल्यावर तिने मला आणि माझ्या तिन्ही भावांना संपवून टाकण्याची धमकी दिली. ती माझ्यासाठी जेवण बनवत नसे किंवा कपडेही धुवत नसे. जेव्हा तिला विचारण्यात आले की तिला कोणासोबत राहायचे आहे, तेव्हा तिने प्रियकराची निवड केली." राजकुमारने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस मध्यस्थीदरम्यान पत्नीने स्पष्ट केले की तिला पतीसोबत नाही तर प्रियकरासोबत राहायचे आहे. त्यानंतर राजकुमारने तिला प्रियकराबरोबर जाण्याची परवानगी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news