Iran-Israel War Escalation | हवाई हल्‍ल्‍यात इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खतीब ठार : इस्रायलचा दावा

Iran-Israel War Escalation | २४ तासांत तिसरी मोठी कारवाई, इराणकडून अद्याप वृत्ताला अधिकृत दुजोरा नाही
Iran-Israel War Escalation
हवाई हल्‍ल्‍यात इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खतीब ठार झाल्‍याचा दावा इस्रायलने केला आहे.
Published on
Updated on
Summary

इस्‍त्रायलने केलेला दावा खरा ठरला तर तर दोन दिवसांतील इराणच्या तिसऱ्या मोठ्या नेत्याची ही हत्या असेल. यापूर्वी मंगळवारी इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारिजानी आणि बासिज दलाचे प्रमुख गुलाम रझा सुलेमानी यांनाही ठार केल्‍याचा दावा इस्रायलने केला होता.

Iran-Israel War Escalation

जेरुसलेम : इराण युद्धाचा आज १९ वा दिवस आहे. इराणवर अमेरिका आणि इस्रायलकडून सातत्याने हल्ले होत आहेत, तर दुसरीकडे इराणदेखील इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकन तळांना लक्ष्य करत आहे. यादरम्यान इस्रायलने एक मोठा दावा केला आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्त्राईल काट्झ यांनी आज (दि. १८ ) माहिती दिली की, इस्रायली संरक्षण दलाने (IDF) रात्रभर केलेल्या हल्ल्यात इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खतीब ठार झाले आहेत. दरम्‍यान, इराणने अद्याप खतीब यांच्या मृत्यूच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

नेतन्‍याहूंनी इस्‍त्रायलच्‍या लष्‍कराला दिली पूर्ण मोकळीक

खतीब यांच्या मृत्यूची घोषणा करताना काट्झ यांनी अधिक तपशील न देता सांगितले की, "आज दिवसभरात सर्व आघाड्यांवर मोठे 'सरप्राइजेस' मिळण्याची शक्यता आहे." तसेच, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लष्कराला कोणत्याही वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याला मारण्यासाठी अतिरिक्त परवानगीशिवाय पूर्ण मोकळीक दिली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Iran-Israel War Escalation
US-Israel Attacks Iran | अमेरिका, इस्रायलचा इराणवर हल्ला; इराणचे संरक्षणमंत्री नसिराजादेह, लष्कराचा कमांडर मोहम्मद पाकपौर ठार

दोन दिवसांतील तिसरी मोठी कारवाई

इस्‍त्रायलने केलेला दावा खरा ठरला तर तर दोन दिवसांतील इराणच्या तिसऱ्या मोठ्या नेत्याची ही हत्या असेल. यापूर्वी मंगळवारी इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारिजानी आणि बासिज दलाचे प्रमुख गुलाम रझा सुलेमानी यांनाही ठार केल्‍याचा दावा इस्रायलने केला होता.

Iran-Israel War Escalation
Israel Iran conflict | 'इस्लामिक रिव्होल्युशनरी'चा कमांडर ठार, इराणच्‍या ‘तालेघन’ अणू केंद्रावरही हल्ला : इस्रायलचा दावा

कोण होते इस्माईल खतीब?

इस्माईल खतीब यांचा जन्म १९६० मध्ये इराणच्या दक्षिण खोरासान प्रांतातील घायनात येथे झाला होता. ते एक शिया धर्मगुरू होते, ज्यांनी इराणच्या न्यायपालिका आणि गुप्तचर मंत्रालयात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. १९८० च्या दशकात इराण-इराक युद्धादरम्यान त्यांनी 'रिव्होल्यूशनरी गार्ड्स'मध्ये सेवा बजावली होती. सायबर कारवायांमुळे २०२२ मध्ये अमेरिकेने खतीब यांच्यावर निर्बंध लादले होते. अमेरिकेच्या मते, खतीब सायबर हेरगिरी आणि रॅन्समवेअर हल्ल्यांशी संबंधित नेटवर्कचे नेतृत्व करत होते. दरम्‍यान, इस्रायलच्या या कारवाईचा तुर्कीने तीव्र निषेध केला आहे. तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांनी या कारवायांना "आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधातील बेकायदेशीर राजकीय हत्या" असे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news