Harshwardhan Sapkal | अशोक खरातसारखे लोक महायुतीने पाळून ठेवलेत, फोटो शेअर करत हर्षवर्धन सपकाळ यांचे टीकास्त्र!

हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर अशोक खरातचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यासोबतचे फोटो शेअर
Harshwardhan Sapkal
फोटो सौजन्य: हर्षवर्धन सपकाळ फेसबुक पेज
Published on
Updated on

नवी दिल्ली : कॅप्टन अशोक खरात या बलात्कारी ज्योतीषीचा भारतीय जनता पक्षाशी व महायुती सरकारसोबत जवळचा संबंध आहे. अनेक मोठ्या लोकांसोबत अशोक खरातचे फोटो आहेत. या खरातसारखे अनेक भोंदू यांनी स्वार्थासाठी पाळून ठेवलेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. 

हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर अशोक खरातचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यासोबतचे फोटो शेअर केले. 'पुढारी'शी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अशोक खरातचे सगळे फोटो पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहेत. अशोक खरातला वाचवण्याचा प्रयत्न सरकारने चुकूनही करू नये. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे लक्षात ठेवावे. दरम्यान, अशोक खरात प्रकरणात सर्व ५८ प्राप्त व्हिडिओतील पिडीत महिला किंवा इतरही महिलांवर झालेल्या अत्याचाराची लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. 

Harshwardhan Sapkal
Sanjay Raut | अशोक खरात प्रकरण एपस्टिन फाईल्सपेक्षा भयंकर, मुख्यमंत्री गप्प का : संजय राऊत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news