Yuzvendra Chahal quits alcohol | "दारू पिणे बंद केले... " : IPLपूर्वी युझवेंद्र चहलचा मोठा खुलासा

Yuzvendra Chahal quits alcohol | एबी डिव्हिलियर्सच्या पॉडकास्टमध्ये दिला गेल्या हंगामातील दुखापतींच्‍या आठवणींना उजाळा
पंजाब किंग्स संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल.
पंजाब किंग्स संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल.
Published on
Updated on
Summary

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने आगामी IPL 2026 च्या तयारीसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने आपण पूर्णपणे मद्यपान बंद केले असल्याचा खुलासा केला आहे.

Yuzvendra Chahal quits alcohol

चंदीगड : पंजाब किंग्स संघाचा फिरकीपटू चहल नुकताच दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्सच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला. यावेळी त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि फिटनेसवर भाष्य केले. IPL 2025 मध्ये चहलची कामगिरी चांगली झाली होती. पंजाब किंग्सने उपविजेतेपद पटकावले होते.आता २०२६ आयपीएलचे केवळ जेतेपद मिळवण्याबरोबरच उत्कृष्ट फिटनेस आणि आत्मविश्वासाने मैदानात उतरण्यासाठी युझवेंद्र चहल सज्ज झाला आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून दारू पिणे बंद

डिव्हिलियर्सशी बोलताना चहल म्हणाला, "मी गेल्या सहा महिन्यांपासून दारू पिणे बंद केले आहे. आता मी ३५ वर्षांचा झालो आहे, त्यामुळे मला अधिक सक्रिय राहायचे आहे आणि माझ्या संघासाठी १५० टक्‍के योगदान द्यायचे आहे. एक वरिष्ठ खेळाडू म्हणून, आयपीएलमधील इतर खेळाडूंनी माझ्याकडून काहीतरी शिकावे, अशी माझी इच्छा आहे."

पंजाब किंग्स संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल.
Yuvraj Singh: करिअर धोक्यात! अभिषेक आणि सॅमसननंतर आता हा स्टार खेळाडू युवराजकडे; IPLमध्ये नशीब बदलणार?

... तर २०२५ मध्‍ये आम्‍ही नक्‍कीच चॅम्पियन झालो असतो

IPL 2025 मध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सने उत्कृष्ट कामगिरी केली होती, मात्र अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध त्यांना ६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाबद्दल बोलताना चहल म्हणाला की, अंतिम सामन्यात आम्हाला मार्को जॅन्सनची उणीव भासली. तो संघात असता, तर आम्ही नक्कीच चॅम्पियन झालो असतो. संपूर्ण स्पर्धेत त्याने ज्या प्रकारे गोलंदाजी केली ती अप्रतिम होती. शिवाय फलंदाजीतही तो शेवटच्या षटकांमध्ये दोन-तीन षटकार मारण्याची क्षमता ठेवतो. यंदा तो ज्या लयीत आहे, ते पाहता प्रतिस्पर्धी सलामीवीरांसाठी ते सोपे नसेल."

पंजाब किंग्स संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल.
Sanju Samson Video: ‘उडा देंगे सर’… वैभव सूर्यवंशीचं धाडस; संजू सॅमसनने सांगितला IPL डेब्यूचा किस्सा

दुखापतीमुळे कामगिरीवर झाला होता परिणाम

चहलने आयपीएलच्‍या गेल्या हंगामातील आपल्या दुखापतींच्‍या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला, "गेल्या वेळी मी स्वतःच्या कामगिरीवर थोडा नाराज होतो. केकेआरविरुद्धच्या सामन्यानंतर माझ्या बरगडीला दुखापत झाली होती. त्यानंतर नॅकललाही फ्रॅक्चर झाले. त्यामुळे मला सेमीफायनल आणि फायनलमध्ये मला हवी तशी लेग-स्पिन गोलंदाजी करता आली नाही. म्हणूनच, या वर्षी मला सर्वप्रथम माझ्या शरीराची आणि फिटनेसची काळजी घ्यायची आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news