Dhurandhar 2 OTT Release: थिएटरमध्ये धुमाकूळ! ‘धुरंधर 2’ OTT वर कधी येणार? रिलीज डेट आणि प्लॅटफॉर्मबाबत मोठी अपडेट

Dhurandhar 2 OTT Release: रणवीर सिंगचा ‘धुरंधर 2’ थिएटरमध्ये जोरदार कमाई करत असून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर OTT रिलीज होणार असून जूनमध्ये येण्याची शक्यता आहे.
Dhurandhar 2 OTT Release
Dhurandhar 2 OTT ReleasePudhari
Published on
Updated on

Dhurandhar 2 OTT Release Date Platform: रणवीर सिंगचा बहुचर्चित ‘धुरंधर 2’ (धुरंधर: द रिवेंज) चित्रपट सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. 18 मार्च रोजी पेड प्रीव्ह्यूमधून दमदार सुरुवात केल्यानंतर आता हा चित्रपट जगभरात अधिकृतपणे प्रदर्शित झाला आहे. समीक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या असून प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाबद्दल जबरदस्त उत्सुकता पाहायला मिळत आहे. त्यामुळे थिएटरमध्ये गर्दी वाढली आहे.

चित्रपटाला मिळालेल्या या जबरदस्त प्रतिसादामुळे आता प्रेक्षकांमध्ये एकच प्रश्न चर्चेत आहे, तो म्हणजे ‘धुरंधर 2’ OTT वर कधी आणि कुठे पाहायला मिळणार? माहितीनुसार, ‘धुरंधर’ या पहिल्या भागाने थिएटरनंतर नेटफ्लिक्सवर एंट्री केली होती.

मात्र, यावेळी ‘धुरंधर 2’ वेगळ्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर (Jio Hotstar) स्ट्रीम होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटाचे डिजिटल हक्क सुमारे 150 कोटी रुपयांना विकले गेल्याचं सांगितलं जात आहे.

Dhurandhar 2 OTT Release
Sharayu Date: सारेगमप लिटिल चॅम्प फेम शरयू दातेचं लग्न ठरलं, केनियात केलं प्रपोज; फोटो viral

OTT रिलीज डेटबाबत मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण सध्याच्या ट्रेंडनुसार, चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर साधारण 45 ते 60 दिवसांनी OTT वर येतो. त्यामुळे ‘धुरंधर 2’ जूनच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा त्यानंतर OTT वर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याचा अंतिम निर्णय चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीवर अवलंबून असेल.

दरम्यान, या चित्रपटाची सुरुवात इतकी दमदार झाली आहे की OTT रिलीज थोडी पुढे ढकलली जाऊ शकते. पेड प्रीव्ह्यूमधूनच चित्रपटाने तब्बल 43 कोटींची कमाई केली आहे, तर पहिल्या दिवशीही तो बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. 100 कोटींच्या पुढे ओपनिंग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर हीच गती कायम राहिली, तर निर्माते चित्रपट जास्त काळ थिएटरमध्ये ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतात.

Dhurandhar 2 OTT Release
Gold Price Crash: 4 दिवसांत सोनं 50 हजारांनी स्वस्त; चांदी आणि शेअर बाजारही कोसळले, नेमकं कारण काय?

आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंगसह संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन प्रमुख भूमिकेत आहेत. दमदार स्टारकास्ट, अ‍ॅक्शन आणि कथानकामुळे ‘धुरंधर 2’ सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. थिएटरमध्ये यशस्वी ठरलेला ‘धुरंधर 2’ OTT वर कधी येणार, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news