Bhavana Gawali | वाशिम शहरातील 7 प्रमुख रस्ते, विकास कामांसाठी 9 कोटी 40 लाखांचा निधी: भावना गवळी

वाशिम शहरातील वाहतुकीचा आणि अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार
 Bhavana Gawali
Bhavana Gawali Pudhari
Published on
Updated on

Washim Road Funds

वाशिम : केंद्र शासनाच्या 'भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष अर्थसहाय्य' योजनेअंतर्गत वाशिम शहरातील सात प्रमुख रस्ते आणि विकास कामांसाठी ९ कोटी ४० लक्ष रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. या कामांना लवकरच प्रशासकीय मंजुरी मिळणार आहे. शिवसेना नेत्या आमदार भावना गवळी पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली . त्याच्या सततच्या प्रयत्नाला यश आले आहे. या निधीमुळे वाशिम शहरातील वाहतुकीचा आणि अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

भांडवली गुंतवणुकीसाठी केंद्र सरकार राज्यांना ५० वर्षांच्या बिनव्याजी कर्जाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य पुरवते. या योजनेचा लाभ घेत आ. भावना गवळी यांनी १० सप्टेंबर २०२५ रोजी वाशिम जिल्ह्यातील विविध नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी एकूण ५१ कोटी रुपयांचे प्रस्ताव संचालक, नगर रचना विभाग (पुणे) यांच्याकडे सादर केले होते. यामध्ये वाशिम शहरासाठी ९ कोटी ४० लक्ष रुपयांच्या कामांचा प्रामुख्याने समावेश आहे.

 Bhavana Gawali
Washim Crime | मुरुमाच्या ढिगाऱ्याखाली आढळलेला मृतदेह पंचाळा येथील तरुणाचा; हत्येचे गूढ उकलणार

प्रस्तावित निधीमधून वाशिम शहरातील अत्यंत महत्त्वाच्या पाटणी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पर्यंतच्या मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण व अनुषंगिक कामे केली जाणार असून, त्यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद आहे. याव्यतिरिक्त, प्रभाग क्रमांक १५ मधील वाळकी फाटा ते वाळकी रस्त्यासाठी १ कोटी, प्रभाग ७ मधील रिसोड मेन रोड ते सोनखास (डीपी रोड) काँक्रिटीकरणासाठी १ कोटी, तर जुनी नगरपरिषद इमारत ते राजनी चौक या मार्गासाठी ७० लक्ष रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच प्रभाग क्रमांक ५ मधील हरिओम नगरातील अंतर्गत रस्त्यासाठी ६० लक्ष आणि प्रभाग क्रमांक ४ व ८ मधील शाळा परिसरामध्ये पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी अनुक्रमे ७० लक्ष व ४९ लक्ष रुपयांचा निधी प्रस्तावित आहे.

राज्यातील नागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नगर विकास विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, आ. भावना गवळी यांनी मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या कामांच्या तातडीच्या मंजुरीबाबत सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावावर सकारात्मकता दर्शवत वाशिम शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. या विकासकामांच्या मंजुरीमुळे शहरातील मुख्य बाजारपेठ आणि रहिवासी भागातील दळणवळण अधिक सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news