

'बिग बॉस मराठी ६' (Bigg Boss Marathi 6) मध्ये ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) हिची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाल्यापासून घराचे वातावरण पूर्णपणे बदलले आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये राखीने घरातील सदस्यांना दिलेली 'वॉर्निंग' सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
Bigg Boss Marathi-6 - rakhi sawant warning in the house
ड्रामा क्वीन राखी सावंतने बिग बॉसच्या घरात आपला आवाज चढवला आहे. दीपाली सय्यद यांच्याशी ती बाचाबाची करताना दिसतेय. व्हायरल प्रोमोमध्ये दीपाली-राखी बसलेल्या दिसताहेत. दोघींमध्ये संवाद सुरु आहे.
दीपाली म्हणते राखीला...'मी ठरवलंय.. तुला आता मी हलक्यात घेणारच नाही..' राखी म्हणते-'तू मला घे सीरीयस..तुम्ही लोक मला सीरीयस घ्या..नाही तर पश्चाताप होणार. इसमे तुम्हारा घाटा मग तुम्ही बाहेर जाता... मला टार्गेट करतात. मी माझे तीन क्लोजअप दिले फक्त...तेही यांना जड जातंय...'
आता राखी सर्वांना वॉर्निंग दिल्यानंतर तिच्याशी घरातील सस्य कसे वागतात, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
राखीच्या या वॉर्निंगवर सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींना वाटते की राखी मुद्दाम ड्रामा करत आहे, तर काहींच्या मते राखीमुळेच या शोमध्ये खरी गंमत येत आहे.
गोल्डन रेशनकार्डचं प्रकरण...
राखी सावंत हातात द्राक्षे घेऊन म्हणते-आम्ही किती आमीर आहोत...यावर संकेत, सागर कारंडे तिची धम्माल उडवताना दिसतात. दुसरीकडे, दीपाली सय्यद गंभीर आवाजा म्हणताना दिसते की, कोल्ह्याला द्राक्षे आंबट...दीपालीच्या या वाक्याने नव्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे, हे उत्सुकतेचे ठरणार आहे.
राखी सावंतने वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात प्रवेश केला होता. "राखी जाणार आणि गेम पालटणार" असा चंग बांधूनच ती घरात शिरली. नेहमीप्रमाणे राखीने घरात शिरताच राडा सुरू केला. राकेश बापटसोबत ती फ्लर्ट करताना दिसली. राखीच्या वर्तनामुळे होस्ट रितेश देशमुखनेही तिची शाळा घेतली. एका व्हायरल प्रोमोमध्ये, तिच्या वाढलेल्या अतिरेकी वागणुकीमुळे बिग बॉसने तिला कन्फेशन रूममध्ये बोलावून कडक शब्दांत सुनावले आणि सुरक्षारक्षकांकडून (Bouncers) तिला घराबाहेर काढले जात असल्याचेही दाखवण्यात आले होते.