Nora Fatehi song Sarke Chunar ban|लोकसभेत 'सरके चुनर'चा गंभीर मुद्दा उपस्थित, अखेर नोरा फतेहीच्या या गाण्यावर बंदी, अभिनेत्री व्हिडिओ जारी करत म्हणाली...

Nora Fatehi song Sarke Chunar banned| लोकसभेत 'सरके चुनर'चा गंभीर मुद्दा उपस्थित, अश्विनी वैष्णव म्हणाले..
nora fatehi
Nora Fatehi song Sarke Chunar officially banned pudhari photo
Published on
Updated on
Summary

नोरा फतेहीच्या 'सरके चुनर तेरी सरके' या गाण्यातील कथित अश्लीलतेचा मुद्दा आज लोकसभेत गाजला. काही खासदारांनी या गाण्यावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली, ज्यावर उत्तर देताना माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, "भारतीय संस्कृतीचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही सामग्रीला प्रोत्साहन दिले जाणार नाही."

नोरा फतेहीच्या 'सरके चुनर तेरी सरके' या गाण्यावरून सुरू असलेला वाद आता थेट संसदेपर्यंत पोहोचला आहे. सोशल मीडियावरील टीकेनंतर आता केंद्र सरकारनेही यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नोरा फतेही आणि संजय दत्तचे गाणे 'सरके चुनर'ला सरकारने बॅन केलं आहे. या गाण्यावरून मागील काही दिवसांपासून सुरु असलेला वादानंतर हा निर्णय घेण्यात आला. लोकसभेत देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. नोरा फतेही, संजय दत्तच्या 'सरके चुनार' गाण्यावर माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव लोकसभेत जोरदार टीका केली.

nora fatehi
Dhurandhar 2 Pre-released earn | छप्पर फाड के! 'धुरंधर २' रिलीज होण्यापूर्वीच इतक्या कोटींचा गल्ला, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 'जवान', 'ॲनिमल'ला पछाडले

बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिचे अलीकडेच प्रदर्शित झालेले 'सरके चुनर तेरी सरके' हे गाणे आता राजकीय वादाचे केंद्र बनले आहे. या गाण्यातील बोल्ड डान्स स्टेप्स आणि कॅमेऱ्याचे अँगल यावरून सोशल मीडियावर आधीच संताप व्यक्त होत होता, मात्र आज हा मुद्दा थेट लोकसभेत उपस्थित करण्यात आला.

संजय दत्तचा आगामी चित्रपट 'केडी: द डेविल'चे आयटम नंबर "सरके चुनर" बॅन करण्यात आले आहे. याआधी हे गाणे यु-ट्यूबवरून हटवण्यात आले होते. सोशल मीडियावर अनेक दिवस या गाण्याच्या वादानंतर केंद्र सरकारने यावर पाऊल उचलले. लोकसभेत या गाण्याच्या अश्लीलतेचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यानंतर, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं की, समाज आणि संस्कृतीच्या मर्यादेचा विचार करता काहीही कंटेंट दाखवण्याची परवानगी दिली जाणार नाही.

nora fatehi
Shraddha Kapoor wedding buzz | श्रद्धा कपूर राहुल मोदीशी लग्न करण्याच्या तयारीत? मावशी तेजस्विनी कोल्हापुरे काय म्हणाली?

लोकसभेत हा मुद्दा समाजवादी पक्षाचे खासदार आनंद भदौरिया यांनी उपस्थित केला. त्यांनी गाण्याते बोल आणि समाजावर पडणाऱ्या नकारात्मक परिणामावर चिंता जाहीर केली. उत्तरादाखल केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सभागृहासा संबोधित करत एक मोठं अपडेट दिलं की, हे गाणे आधीच बॅन करण्यात आले आहे. आणि सर्व प्लॅटफॉर्म्सवरून हटवण्याचे निर्देश दिले गेले आहेत.

नोरा फतेहीने जारी केला व्हिडिओ

नोराने इन्स्टावर एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यामध्ये ती म्हमाताना दिसते की, मी याचे समर्थन करते.... या विरोधाबद्दल धन्यवाद, चित्रपट निर्मात्यांनी सुदैवाने ते गाणे काढून टाकले आहे. मी सर्वांना विनंती करेन की हे गाणे शेअर करणे थांबवा कारण तुम्ही त्याला विनाकारण एक व्यासपीठ देत आहात. एक वेगळा मुद्दा म्हणजे, तुमच्यापैकी काहीजण माझ्या चारित्र्यावर हल्ला करण्याची संधी म्हणून याचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत हे मी पाहतेय.. हे दुर्दैवी आहे. असो, मी आणि माझी टीम भविष्यात अशा परिस्थितीत अधिक काळजी घेऊ. तथापि, मला पुन्हा एकदा स्पष्ट करायचे आहे की, मला या हिंदी गाण्याबद्दल काहीही कल्पना नव्हती, मी त्यावर सादरीकरण केले नाही आणि माझ्या प्रतिमेसह ते वापरण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news