Prmod Sawant | गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर पुणे येथे हृदयशस्त्रक्रिया!

दुपारी छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, यशस्वी ॲन्जिओप्लास्टी
Prmod Sawant
डॉ. प्रमोद सावंत
Published on
Updated on

पुणेः गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक येथे हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आज दुपारी छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची अँजिओग्राफी केली. त्यानंतर ॲन्जिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही शस्त्रक्रिया हृदयरोग तज्ज्ञ डॉ. समिन शर्मा यांनी यशस्वीरित्या पार पाडली. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या प्रमोद सावंत यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

Prmod Sawant
Goa CM Dr. Pramod Sawant 7 Years | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आज सात वर्षे पूर्ण

 आजच त्‍यांच्या मुख्यमंत्रीपदाची 7 वर्षे पूर्ण

विषेश म्हणजे डॉ. प्रमोद सावंत यांना गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून 19 मार्च रोजी 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांनी शपथ घेतली होती. गुरुवारी, १९ मार्च रोजी ७ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. १९ मार्च २०१९ रोजी त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतरही तेच राज्याचे मुख्यमंत्री बनले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news