Dhurandar 2 Vs Tighee : धुरंधर २ चं वादळ आलंय, पण...; 'तिघी'च्या निर्मात्याची पोस्ट चर्चेत

Dhurandar 2 Vs Tighee : धुरंधर २ चं वादळ आलंय, पण...; 'तिघी'च्या निर्मात्याची पोस्ट चर्चेत
Dhurandar 2 Vs Tighee : धुरंधर २ चं वादळ आलंय, पण...; 'तिघी'च्या निर्मात्याची पोस्ट चर्चेत
Published on
Updated on
Summary

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर २' मुळे अनेक मराठी चित्रपटांचे शोज कमी झाले आहेत. मात्र, ६ मार्चला प्रदर्शित झालेला 'तिघी' हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, सेन्सॉर बोर्डाचा त्रास आणि मार्केटिंग आव्हान असूनही आम्ही एकही कट न लावता चित्रपट तुमच्यापर्यंत आणला.

मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याची स्थिती पाहता, एकीकडे रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' (Dhurandhar 2) या बिग बजेट चित्रपटाचे वादळ घोंगावत असताना, दुसरीकडे आशयघन मराठी चित्रपट 'तिघी' (Tighee) आपल्या हिंमतीवर पाय रोवून उभा आहे. सेन्सॉर बोर्डाचा त्रास आणि मार्केटिंगमधील अडचणींचा सामना करूनही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रेक्षकांचा तिघी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका बाजूला बॉलिवूडचा बिग बजेट चित्रपट 'धुरंधर २' धुमाकूळ घालत आहे, तर दुसऱ्या बाजूला 'तिघी' (Tighee) या मराठी चित्रपटाने आपल्या आशयाच्या जोरावर प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, अनेक अडचणींचा सामना करून रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या पाठीशी मराठी प्रेक्षक खंबीरपणे उभा राहिल्याचे पाहायला मिळत आहे.

एरव्ही, असे नेहमीच निदर्शनास येते की, मराठी सिनेमांना थिएटर्स फार कमी मिळतात किंवा मिळत नाहीत. दुसरीकडे, प्रेक्षक वर्गाचा कल हिंदीपटाकडे अधिक वळणारा दिसतो. इथे मात्र मराठी चित्रपट तिघीसाठी प्रेक्षकांनी भरभरून दिलेला प्रतिसाद वाखाणण्याजोगे आहे.

निकम महाजन यांनी इन्स्टा पोस्टमध्ये काय म्हटलंय?

निर्माता निकम महाजन यांनी बक माय शो वरील तिघीचे बुक शोजचे काही स्नॅप शॉट्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनी इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलंय-

'' पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना अनेक शुभेच्छा! तिघी हा सिनेमा तुमच्यापर्यंत पोचवणं हे आमच्यासाठी खूप अवघड होतं. censor कडून झालेला त्रास, त्यामुळे शेवटच्या मिनिटापर्यत marketing वर झालेला परिणाम आणि अश्या अनेक संकटांना सामोरे जात आमच्या संपूर्ण चमूने हा सिनेमा ठरल्याप्रमाणे, आणि एक ही cut न करता तुमच्यापर्यंत ६ मार्च ला आणला. कालपासून धुरंधर २ नावाचं एक वादळ सिनेमागृहात आलंय. अर्थातच आपले shows कमी झाले, आणि आम्हाला सुद्धा असं वाटलं की हा weekend आपण काही करू शकणार नाही.

सहज bookmyshow चेक करायला घेतलं आणि हे दिसलं! महाराष्ट्र आणि मराठी प्रेक्षक हा धुरंधर २ धुमाकूळ घालत असताना सुद्धा तिघी च्या पाठी खंबीरपणे उभा आहे हे बघून मन सुखावलं! आज महाराष्ट्रात, खास करून मुंबई आणि पुण्यात धुरंधर २ सोडल्यास फक्त तिघी चे खेळ सुरू आहेत, आणि तुमच्या पाठिंब्याने ते भरगच्च गर्दीत सुरू आहेत! ह्या वादळात तिघी ला आसरा दिल्याबद्दल तुमचे खूप आभार. अशीच गर्दी करत रहा! आम्ही सिनेमा सुरू ठेवू! Long live cinema!''

आव्हानांवर मात करत चित्रपट रिलीज

'तिघी' चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट लिहून सांगितले की, हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते. सेन्सॉर बोर्डाकडून झालेला त्रास आणि त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत मार्केटिंगवर झालेला परिणाम यामुळे चित्रपटाच्या यशावर टांगती तलवार होती. मात्र, निर्मात्यांनी हार न मानता एकही 'कट' न लावता ६ मार्चला हा चित्रपट रिलीज केला.

Dhurandar 2 Vs Tighee : धुरंधर २ चं वादळ आलंय, पण...; 'तिघी'च्या निर्मात्याची पोस्ट चर्चेत
Nora Fatehi sarke chunari Song Row: नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ, राष्ट्रीय महिला आयोगाने 'केडी : द डेविल'च्या टीमला जारी केलं समन

“तिघी” चित्रपटाचे दिग्दर्शन जीजिविषा काळे तर निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे, नेहा पेंडसे बायस यांची आहे. या चित्रपटामध्ये भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी, नेहा पेंडसे यांच्या भूमिका आहेत.

आई आणि मुलगी यांच्यातलं नातं... कधी अतूट माया, कधी न बोलता समजणारी साथ, तर कधी पिढ्यांतील विचारांमुळे निर्माण होणारे ताणतणाव, या सगळ्यांच्या पलीकडे हे नातं कायम घट्ट राहातं. भावनिक चढ-उतार आणि वास्तवाला स्पर्श करणाऱ्या नात्याचा मागोवा ‘तिघी’ चित्रपटात घेण्यात आला आहे.

Dhurandar 2 Vs Tighee : धुरंधर २ चं वादळ आलंय, पण...; 'तिघी'च्या निर्मात्याची पोस्ट चर्चेत
Sharayu Date: सारेगमप लिटिल चॅम्प फेम शरयू दातेचं लग्न ठरलं, केनियात केलं प्रपोज; फोटो viral

धुरंधर-२ चे घोंगावते वादळ

चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच रणवीर सिंहचा धुरंधर २ प्रचंड चर्चेत होता. १९ मार्च रोजी हा चित्रपट रिलीज झाला आहे. एक दिवस आधी पेड प्रिव्यू ठेवण्यात आला होता. आता चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. धुरंधर द रिवेंजने पेड प्रिव्यूमध्ये बंपर ओपनिंग घेतले. रिपोर्टनुसार, धुरंधर २ चे भारतात एकूण २१ हजार २२० शोज सुरु आहेत. भारतात ५२.७१ कोटी आणि टोटल नेट कलेक्शन ४८.३० कोटी झाले आहे. वर्ल्डवाईड कमाई ७५ कोटींच्या जवळपास पोहोचले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news