नाशिक : डुकराला हुसकावले म्हणून मारहाण, सात जणांविरोधात गुन्हा | पुढारी

नाशिक : डुकराला हुसकावले म्हणून मारहाण, सात जणांविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दारात वाळत घातलेले धान्य खाणाऱ्या डुकराला हुसकावल्याच्या रागातून टोळक्याने कुटुंबाला मारहाण केल्याची घटना एकलहरा गेट परिसरात घडली. फिर्यादी रमेश कारभारी चव्हाण (रा. पहाडीबाबा झोपडपट्टी, एकलहरा गेट, नाशिकरोड) यांच्या राहत्या घरासमोर त्यांची आई गहू व इतर धान्य वाळवत होती. त्याचवेळी एक डुक्कर धान्य खाऊ लागल्याने, संबंधित महिलेने त्याला हुसकावले.

त्यावरून शेजारी राहणारे संशयित शांताराम कापसे, अनिल शिंदे, मधुकर कापसे, प्रकाश कापसे, राजू कापसे, अनिकेत कापसे, खली ऊर्फ संतोष पवार (सर्व रा. पहाडीबाबा झोपडपट्टी, नाशिकरोड) यांनी फिर्यादी चव्हाण आणि त्यांची आई व दोन पुतण्यांना शिवीगाळ व दमदाटी करून लाकडी दांडका व बॅटने कुठल्यातरी हत्याराने मारहाण केली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक गोसावी अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण? Mouni Roy Birthday: तू माझं आयुष्य बदललं, दिशा पटानीच्या मौनीला अशाही शुभेच्छा टाईम बेबीसाठी रिताभरी चक्रवर्तीचा खास लूक Ganeshotsav 2023 : साजिऱ्या दगडूशेठ बाप्पांच्या स्वागताला लोटली पुण्यनगरी Prajakta Mali : ठरलं तर मग; Beautiful प्राजू ‘तीन अडकून सीताराम’ च्या प्रेमात सारं काही पोटासाठी ! गौतमीच्या या व्हायरल फोटोंची होते आहे चर्चा या सणांना Claasy दिसायचं आहे ? मानुषी छिल्लरचा हा लूक जरूर ट्राय करा Boho and backless : श्रीया पिळगावकरचा Bold अंदाज Saie Tamhankar : लाख सुंदर असतील पण तू लाखात एक आहेस सई पुलकित सम्राटच्या फॅशन स्टेटमेंटची चर्चा
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण?