बेळगाव : शाळकरी मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू | पुढारी

बेळगाव : शाळकरी मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : मुचंडी (ता. बेळगाव) येथे शाळकरी मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. सिद्धेश्वर गल्ली येथे गुरूवार दि. २ रोजी दुपारी विहिरीत बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. गौतम श्रीकांत कोणो (वय १०) असे त्याचे नाव आहे.

अधिक वाचा-

सांगली : मिरज तहसीलमधील अव्वल कारकून लाच घेताना जाळ्यात

पुणे : घरात घुसून बिबट्याचा हल्ला; चार शेळ्या, दोन बोकडांचा मृत्यू

गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. त्यावेळी त्याला बाहेर काढण्यात आले. गुरुवारी दुपारी तीन वाजल्यापासून गौतम बेपत्ता झाला होता. सायंकाळी ५ नंतर त्याच्या कुटुंबियांनी गावांमध्ये तसेच परिसरात शोध घेतला. पण, तो आढळून आला नाही.

अधिक वाचा-

पुढारी अग्रलेख : रखडलेली यादी

रहस्यमय तपकिरी रंगाच्या खुजा तार्‍याचा शोध

सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्याचा फोटो व्हायरल करण्यात आला. त्याबाबत माहिती असल्यास, संपर्क साधावा असे त्याच्या कुटुंबियांनी आवाहन केले होते. मात्र गुरुवारी रात्री अकरा वाजता त्याचा मृतदेह आढळून आला.

अधिक वाचा-

हत्तीच्या कातडीतूनही रक्त पिणारी आफ्रिकेतील माशी!

पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळावर दुसर्‍यांदा केले ड्रील

त्याच्या घरापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर असणाऱ्या विहिरीमध्ये तो आढळून आला. खेळता खेळता गौतम हा विहिरीकडे गेला असावा. असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, एक लहान भाऊ आहे.

गौतम मुचंडी येथील मराठी शाळेत शिक्षण घेत होता. शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने मुचंडी गावात हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेदेखील वाचा-

सोनाली कुलकर्णीचा गुलाबी ड्रेसमध्ये हटके फोटोशूट

कोल्हापूर जिल्ह्यातील चार धरणांना गळतीचा धोका; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

आठ लग्ने करून लुटारू नवरी निघाली एड्सबाधित; धाबे दणाणले  

पाहा व्हिडिओ – एक एकर टोमॅटो शेतीसाठी खर्च किती आणि हातात मिळतात किती ?

Back to top button