सोनाली कुलकर्णीचा गुलाबी ड्रेसमध्ये हटके फोटोशूट
मुंबई; पुढारी ऑनलाईन : मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या नवनव्या फोटो शूटमुळे चर्चेत आली आहे. सध्या सोनाली हिने आणखी एक हटके फोटोशूट केले आहे.
सोनाली कुलकर्णीने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊटवर नुकतेच काही हटके फोटो शेअर करत चाहत्यांना भूरळ घातली आहे. या फोटोत ती खूपच हॉट दिसत आहे.
गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये जलवा
सोनालीने गुलाबी रंगाच्या ड्रेस परिधान करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या देखण्या रुपात सोनालीचे सौंदर्य आणखी खुलले आहे. या फोटोत सोनालीच्या बाजुला रंगीबेरंगी पर्स ठेवल्याचे दिसत आहेत. खास करून, सोनालीने हा हटके लूक saregamapalilchamps साठी केला आहे. सोनालीने या फोटोसोबत हटके कॅप्शनदेखील दिली आहे.
सोनाली हे फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर कॉमेन्टसचा पाऊस पडत आहे. तर एका युजर्सने या फोटोंवर कॉमेंन्टस करत आगीचा आणि हास्याचा ईमोजी शेअर केला आहे.
या फोटोंवर एका युजर्सने 'नेहमीप्रमाणे मारतोय,' तर दुसऱ्या एकाने 'कोणाचे फॉलोवर्स वाढवायचे असेल तर… अशी कॉमेंन्टस केल्या आहेत.
सोनाली गेल्या काही दिवसांपासून आपल्या पती कुणाल बेनोडेकरसोबत मालदिवमध्ये सुट्याचा आनंद एन्जॉय करत आहे.
तेथूनच ती आपल्या चाहत्यांसाठी हटके फोटोशूट करत असते. लग्नानंतर सोनालीच्या सौंदर्यात दिवसेंदिवस खुलत आहे.
याआधी सोनालीने जांभळ्या रंगाचा टॉप आणि निळ्या जिन्समध्ये पर्पल फोटोशूट केले होते. या पर्पल फोटोशूटपूर्वी सोनालीने वेस्टर्नमध्ये नथीचा नखरा दाखवला होता. #नथीचानखरा returns!अशी कॅप्शन देत सोनालीने खास फोटोशूट केले होते.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सोनालीच्या नव्या चित्रपटाची घोषणाही झाली असून २०२२ च्या नोव्हेंबर महिन्यात सोनालीचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
हेही वाचलंत का?

