बेळगाव : विचित्र अपघातात दुचाकीस्वारासह कारचालक ठार

बेळगाव : विचित्र अपघातात दुचाकीस्वारासह कारचालक ठार
Published on
Updated on

खानापूर; पुढारी वृत्तसेवा : महिंद्रा एक्सयुव्ही कार आणि दुचाकीत झालेल्या विचित्र पण भीषण अपघातात दुचाकीस्वारासह कारचालकही ठार झाला. खानापूर-बेळगाव मार्गावरील सरकारी आयटीआयसमोर गुरुवारी (दि. 25) दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. दुचाकीस्वार रमेश अशोक पाटील (वय 31, रा. भेंडवाड ता. रायबाग व कारचालक समीन पिरजादे (वय 27, रा. संगमेश्वरनगर, कंग्राळी) अशी मृतांची नावे आहेत. सूरज हंबगी, साहिल उस्ताद (दोघेही रा. कोल्हापूर), जॉन केव्हीन (आंध्र प्रदेश), अमीर हमजा निजामी, दानिल शेख व नवीन पिरजादे (तिघेही रा. बेळगाव) हे जखमी झाले.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, बेळगावमधील शेख मेडिकल कॉलेजमधून बीईएमएस पदवी घेऊन नुकत्याच बाहेर पडलेल्या सात मित्रांचा गट बुधवारी (दि. 24) दांडेली काळी नदीपात्रात जलक्रीडेचा आनंद घेण्यासाठी गेला होता. पर्यटन आटोपून गुरुवारी दुपारी बेळगावच्या दिशेने परत येत असताना अतिवेगामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कारने समोरुन चाललेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यातच कारचा टायर फुटल्याने चारवेळा उलटून कार सुमारे दीडशे फूट अंतरावर जाऊन कलंडली. त्यात समीन ठार झाला. तर उर्वरीत सहाजण जखमी झाले. त्यांना लागलीच रुग्णवाहिकेतून बेळगावमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, संजय कुबल, वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. ईश्वर घाडी, विजय कामत आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यात सहभाग घेतला. अपघातस्थळी डीएसपी रवी नाईक, पोलिस निरीक्षक रामचंद्र नाईक, उपनिरीक्षक गिरीश एम. यांनी भेट देऊन पाहणी केली. दुचाकीस्वार रमेश पाटील हे कोंबडी खाद्य उत्पादन कंपनीत कामाला असून ते खानापूर तालुक्यात फिल्डमन म्हणून कार्यरत होते.

हेल्मेटही कूचकामी ठरले

सेवा रस्त्यावरून महामार्गावर आलेल्या दुचाकीला कारने मागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार पाटील यांनी हेल्मेट घातलेले असूनही जमिनीवर जोराने आपटल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर कारचाही चेंदामेंदा झाल्याने एअर बॅग उघडूनही कारचालक समीनचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news