

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव दौर्यामुळे शहरातील पाच मार्गांवरील रहदारी अन्य मार्गांनी वळविण्यात आली आहे. शनिवार, 27 रोजी सायंकाळपासून रविवार, 28 एप्रिल रोजी दुपारपर्यंत हा बदल राहणार आहे.
27 एप्रिल रोजी सायंकाळी बागलकोट रस्तामार्गे व सुवर्णसौधपासून होनग्यापर्यंत दोन्ही बाजूने असणारा सर्व्हिस रोड, तसेच 28 रोजी होनग्यापासून सुवर्णसौधपर्यंत राष्ट्रीय महामार्ग तसेच दोन्ही बाजूंचा सर्व्हिस रस्ता व बागलकोट मार्गावरील सार्वजनिक वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात येणार आहे. कोल्हापूर, निपाणीकडून बेळगाव शहरात येणारी सर्व वाहने संकेश्वरहून हुक्केरीमार्गे वळवण्यात येणार आहेत. एम के हुबळी व धारवाडकडून शहरात येणारी वाहने नेगीनहाळ नेसरगी, भेंडीगिरी क्रॉसमार्गे अन्यत्र वळवण्यात येणार आहेत.
निपाणी, कोल्हापूर, यमकनमर्डीकडून शहरात येणारी वाहने राम ढाबा येथून पुढे सोडण्यात येणार आहेत. बागलकोटहून बेळगाव शहरात येणारी वाहने नेसरगी, गोकाकमार्गे वळवण्यात येणार आहेत. बागलकोट, रायचूर, यरगट्टी मार्गावरून येणार्या बसेस कनकादास सर्कल, कणबर्गी, खनगाव, सुळेभावी पोलीस ठाणा क्रॉसपासून बागलकोटकडे वळवण्यात येणार आहेत. बेळगाव शहरातून येडीयुराप्पा रोड मार्गे अलारवाड ब्रिजमार्गे जाणार्या वाहनांवर बंदी घालण्यात येणार आहे. हा बदल 27 रोजी सायंकाळपासून 28 रोजी दुपारपर्यंत राहणार आहे. याची वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्तालयाने केले आहे.
येडियुराप्पा मार्गावरील बळ्ळारी नाला : बेळगाव शहरातून येणार्या वाहनांसाठी येथे पार्किंगची व्यवस्था केली आहे.
हलगा-मच्छे बायपास : निपाणी, अथणी, चिकोडी, रायबाग, संकेश्वर, हुक्केरीकडून येणार्या वाहनांसाठी पार्किंग.
अलारवाड सर्व्हिस रोड पश्चिम बाजू : बैलहोंगल, बागेवाडी, रामदुर्ग, सौंदत्तीकडून येणारी वाहने.
अलारवाड सर्व्हिस रोड पूर्व बाजू : गोकाक, अरभावी, घटप्रभाकडून येणार्या वाहनांसाठी पार्किंग.
हेही वाचा :