

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : वळती गावातील तागडेवस्तीत बिबट्याचा हल्ला झाला आहे. कौलारू घरात घुसून चार शेळ्या व दोन बोकडांचा त्याने फडशा पाडला. बिबट्याचा हल्ला झाल्यानंतर सकाळी लहु बाबुराव लोखंडे हे आले. त्यावेळी हा प्रकार निदर्शनास आला. लहू लोखंडे यांचे या घटनेत नुकसान झाले आहे.
अधिक वाचा-
शुक्रवारी (दि.३) मध्यरात्री ही घटना घडली. यामध्ये संबंधित लहु बाबुराव लोखंडे या शेतकऱ्याचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिक वाचा-
त्यांच्याकडे एकूण दहा शेळ्या आहेत. घराशेजारी असलेल्या जुन्या कौलारू घरात ते शेळ्या बांधतात. गुरुवारी संध्याकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे शेळ्या बांधल्या होत्या. मध्यरात्री कौलांमधून घरात प्रवेश करत त्याने चार शेळ्या व दोन बोकडांना ठार केले.
अधिक वाचा-
शुक्रवारी (दि. ३) सकाळी लहू बाबुराव लोखंडे हे शेळ्यांना बाहेर काढण्यासाठी गेले. घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी वनविभागाला घटनेची खबर दिली. तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचे हल्ले वाढतच चालले आहेत.
यापूर्वी येथून नजीक असलेल्या गाढवे वस्ती, काटवान वस्ती येथे शेळ्या मेंढ्या ठार झाल्या आहेत. वन विभागाने काहीतरी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यामुळे थांबेल.
शेतकरी लहू बाबुराव लोखंडे यांचे या घटनेत अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
हेदेखील वाचा-