सांगली : मिरज तहसीलमधील अव्वल कारकून लाच घेताना जाळ्यात

मिरज तहसील क्लार्क
मिरज तहसील क्लार्क

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यातील मिरज तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकुनाला ताब्यात घेण्यात आले आहे. मिरज येथे श्रीशैल उर्फ श्रीकांत विश्वनाथ घुळी याने २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्या प्रकरणी तो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे.

अधिक वाचा-

तक्रारदार यांची आई वारसदार असलेल्या जमिनीच्या संदर्भातील निकाल तक्रारदार यांचे बाजूने देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.

अधिक वाचा-

मंडल अधिकारी घुळी व त्यांचे कार्यालयात काम करणारे संगणक ऑपरेटर समीर जमादार याने ही लाच मागितली होती. त्याने ७०,००० रूपये लाचेची मागणी केली होती. त्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी दि. २८.०८.२०२१ रोजी दिला होता.

अधिक वाचा-

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. २९.०८.२०२१ रोजी, दि. ३०.०८.२०२१ रोजी, दि.०१.०९.२०२१ रोजी व दि.०२.०९.२०२१ रोजीच्या तक्रारीची पडताळणी केली. ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे या तक्रारीची पडताळणी झाली.

निकाल तक्रारदार यांचे बाजूने देण्यासाठी मंडल अधिकारी धुळी यांनी सांगितले. त्यांचे कार्यालयात काम करीत असलेले समीर जमादार यांनी लाच मागितली होती.

तक्रारदार यांच्याकडे ७०,००० रूपये लाचेची मागणी केली. त्यापैकी २५,००० रूपये देण्यास सांगून उर्वरीत ४५००० रूपये निकाल लागल्यानंतर देण्यास सांगितले.

त्यानंतर राजवाडा परिसर मंडल अधिकारी कार्यालय, सांगली येथे सापळा लावला. समीर जमादार (वय ३६), संगणक ऑपरेटर (रा. ग्रामपंचायत जवळ मल्लेवाडी ता. मिरज जि. सांगली) याने लाच मागितली.

त्यावेळी तक्रारदाराकडून २५,००० रुपये स्वीकारल्यानंतर त्यांना पकडण्यात आले.

श्रीशैल ऊर्फ श्रीकांत विश्वनाथ घुळी (वय ५६, मुळ पद पुरवठा अव्वल कारकून, तहसील कार्यालय. अति कार्यभार मंडल अधिकारी कुपवाड, बुधगांव रा. शिवाजी नगर, दंडोबा रस्ता, मालगांव ता. मिरज जि. सांगली) यांना ताब्यात घेतले आहे.

दोघांवरोधात सांगली शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केलेली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.

या कारवाईत राजेश बनसोडे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, सुरज गुरव, अप्पर पोलीस उप आयुक्त / अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, सुहास नाडगौडा. तसेच अप्पर पोलीस उप आयुक्त / अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शन मिळाले.

सुजय घाटगे, पोलीस उप अधीक्षक, गुरुदत्त मोरे पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार अविनाश सागर. सलीम मकानदार, संजय संकपाळ, अजित पाटील, प्रीतम चौगुले, भास्कर भोरे, राधिका माने, विना जाधव, श्रीपती देशपांडे, चालक बाळासाहेब पवार यांनी तपासकामात मदत केली आहे.

नागरिकांना आवाहन…

नागरिकांना आवाहन करण्यात येते की लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास येथे संपर्क साधावा. पोलीस उप अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, बदाम चौक, सांगली येथे संपर्क साधावा. अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२३३/२३७३०९५ वर संपर्क साधावा. तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर आणि व्हॉट्स अॅप नंबर ७८७५३३३३३३ व मोबाईल नंबर ८९७५६५१२६२ संपर्क साधावा.

हेदेखील वाचा- 

पाहा व्हिडिओ- महाराष्ट्राची गोधडी थेट विदेशात पोहचली |

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news