आठ लग्ने करून लुटारू नवरी निघाली एड्सबाधित; धाबे दणाणले | पुढारी

आठ लग्ने करून लुटारू नवरी निघाली एड्सबाधित; धाबे दणाणले

पुढारी ऑनलाईन, नवी दिल्ली: लग्नाळू तरुणांना भुरळ घालायची, लग्न करायचं आणि लुटून पसार होणाऱ्या लुटारू नवरी एड्सबाधित आढळली आहे. पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणीने तब्बल आठ लग्ने केली होती. त्यामुळे लग्न केलेल्या तरुणांचे धाबे दणाणले आहे.

पंजाबमधील पटियाला जिल्ह्यामध्ये पोलिसांनी लुटारू नवरीसह चार जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

त्यानंतर या तरुणीची वैद्यकीय चाचणी केली. त्यावेळी ती एचआयव्ही एड्सबाधित असल्याचे समोर आले.

त्यामुळे पोलिसांनाही धक्का बसला. यामुळे आता संबधित तरुणीने लग्न केलेल्या तरुणांचीही वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या तरुणीने आपल्यासोबत तीन तरुणांना घेऊन एक टोळी बनवली होती. ही टोळी लग्नासाठी इच्छुक असलेल्या तरुणांची फसवणूक करत असे.

लग्न झाल्यावर काही दिवस ही तरुणी सासरी नांदत असे आणि काही दिवसांनी संबंधित वर आणि त्याच्या कुटुंबावर मारहाणीचा आणि हुंड्याची मागणी केल्याचा आरोप करत असे.

ही तरुणी पंचायत बोलावून निवाडा करायला भाग पाडत असे. निवाडा झाल्यावर संधी साधून सासरच्या कुटुंबातील दागदागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार होत असे.

या कामात तिची आईही तिला मदत करत असे. या तरुणीकडून फसवणूक झालेल्या आठ जणांपैकी तिघे हे हरियाणातील आहेत. पटियालामध्ये ती नवव्या वराच्या शोधात होती.

तिने तिथे लग्नही केले. आठवडाभर ती तिथे राहून आली. मात्र, ती पोलिसाच्या तावडीत सापडली.

संबधित तरुणीला तीन मुले

संबधित तरुणी हरियाणामधील कैथल जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती ३० वर्षीय असून २०१० मध्ये तिचा विवाह झाला आहे.

तिला सात ते नऊ वयाची तीन मुले आहेत.

त्यानंतर तिचा पती बेपत्ता झाला. तिने चार वर्षांपूर्वी तिने विवाह करून फसवणूक करण्याचा धंदा सुरू केला.

पंजाब आणि हरियाणा राज्यातील अविवाहित, घटस्फोटित विदुरांना शोधत असे आणि त्यांना फसवत असे.

अखेर ती पोलिसांच्या जाळ्यात सापडली. ही लुटारू नवरी एड्सबाधित आढळली आहे.

तरुणांची होणार चाचणी

संबधित तरुणीची वैद्यकीय चाचणी करण्यात आल्यानंतर ती एड्सबाधित असल्याचे समोर आले.

त्यामुळे ज्या तरुणांशी तिने विवाह केला त्यांचीही वैद्यकी तपासणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा: 

Back to top button