छत्रपती संभाजीनगर : मकाईगेटजवळ खोदकामावेळी अढळला पुरातन हौद | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : मकाईगेटजवळ खोदकामावेळी अढळला पुरातन हौद

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील ऐतिहासिक मकाई गेटजवळ सध्या रस्त्यासह केबल वायर टाकण्याचे काम सुरू आहे. या खोदकामादरम्यान सोमवारी सायंकाळी पुरातन मोठा हौद आढळून आल्याने हे काम थांबवून त्याविषयी पुरातन विभागाला माहिती कळविण्यात आली. त्यावरून पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासणी सुरू केली आहे.

शहरातील ऐतिहासिक मकाई गेटजवळ काही दिवसांपासून रस्त्यासह केबल वायर टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना याठिकाणी मोठा ऐतिहासिक हौद आढळून आला.

या विषयी मंगळवारी पुरातन विभागाचे वरिष्ठ अधिकारी येऊन अंधिक तपासणी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असा हौद माकाई गेटच्या उजव्या बाजूला आहे का, याचीही पाहणी करण्यात येणार आहे. या वास्तूचे जतन करणार असल्याची प्राथमिक माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Back to top button