सिंधुदुर्ग: कुडाळ-पिंगुळी मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक: दोघे गंभीर जखमी | पुढारी

सिंधुदुर्ग: कुडाळ-पिंगुळी मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक: दोघे गंभीर जखमी

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : कुडाळ – वेंगुर्ले मार्गावर पिंगुळी रेल्वे ब्रीज नजीक २ मोटरसायकलींची समोरासमोर झालेल्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. हा अपघात आज (दि.२८) दुपारी 12.30 च्या सुमारास झाला. अमित जोशी (मूळ रा. वेंगुर्ले, सध्या रा.बिबवणे) व सायमन रॉड्रिक्स (रा.कुडाळ) असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना गोवा -बांबुळी येथे हलविण्यात आले आहे.

दोन्ही मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेनंतर दोन्ही मोटरसायकलस्वार रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. यावेळी मनसेचे दीपक गावडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ग्रामीण रूग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तातडीने गोवा बांबोळी येथील रूग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती ग्रामीण रूग्णालय व पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली. कुडाळ पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत पंचनामा केला.

हेही वाचा 

Back to top button