अहमदनगर : महिनाभरात ‘या’ तीन धरणांत चार टीएमसी पाणी | पुढारी

अहमदनगर : महिनाभरात 'या' तीन धरणांत चार टीएमसी पाणी

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : अकोले तालुक्यात झालेल्या पावसामुळे महिनाभरात भंडारदरा, निळवंडे आणि मुळा या तीन धरणांत 4 हजार 21 दलघफू पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे या तीन धरणांच्या लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे. जून महिन्यात दोन नक्षत्रे कोरडे गेले. आर्द्रा नक्षत्राने थोडासा दिलासा दिला. जुलै महिन्यात अकोले तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे.

त्यामुळे भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणांत पाण्याची आवक सुरु झाली. महिनाभरात या तीन धरणांत 4 हजार 21 दलघफू पाण्याची आवक झाली. गेल्या काही दिवसांपासून पावसाने गुंगारा दिला. मात्र, पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असल्यामुळे या धरणांतील लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

18 जूनमध्ये भंडारदारा धरणात 5 हजार 697 दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध होता. 18 जुलैला याच धरणात 7 हजार 583 दलघफू इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे. महिनाभरात या धरणात 1 हजार 886 दलघफू इतक्या पाण्याची आवक झाली आहे. मुळा धरणात 9 हजार 350 दलघफू पाणीसाठा होता. आता याधरणात 11 हजार 2 दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

महिनाभरात या धरणात 1 हजार 652 दलघफू इतके पाणी आवक झाली आहे. निळवंडे धरणात महिनाभरापूर्वी 2 हजार 185 दलघफू पाणीसाठा होता. आजमात्र या धरणात 2 हजार 668 दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या तीनही धरणांत पाण्याची आवक होत असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी आनंदी झाले आहे.

हेही वाचा

हे तळे नव्हे, स्वारगेट एसटी स्टँड ! प्रवेशद्वारावर साचले मोठे तळे

नेवाशात मोकाट जनावरांची धरपकड

इथे ओशाळली मानवता..! मणिपूरमध्‍ये दोन महिलांची विवस्‍त्र धिंड, सामूहिक अत्याचार

Back to top button