ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावरील सुनावणी लांबणीवर | पुढारी

ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावरील सुनावणी लांबणीवर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयात समता पक्षाने मशाल चिन्हावर दावा करत याचिका दाखल केली असून, हेच चिन्ह उद्धव ठाकरे गटालाही देण्यात आले आहे. यासंदर्भात सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार होती. मात्र, समता पक्षाकडे पूर्ण कागदपत्रे नसल्याने सुनावणी सहा आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

याअगोदर दिल्ली उच्च न्यायालयात उदय मंडल यांनी यासंदर्भात अपील केले होते. मात्र, न्यायालयाने मंडल यांची याचिका फेटाळली होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात दिले. दरम्यान, निवडणूक आयोगाने काही कालावधीनंतर पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केले. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे.

Back to top button