Death Apple Tree | जगातील सर्वात विषारी झाडः फळे, पाने एवढेच काय याच्या लाकडाचा धूरही असतो जीवघेणा!

Namdev Gharal

जगात एक असे झाड आहे की त्‍याची फळे, पाने त्‍याचबरोबर पानावरुन पडणारा पाऊसही असतो विषारी असतो.

मनुष्याने चुकून याचे फळ खाल्ले तर मृत्‍यू अटळ, नुसता याचा रस जरी अंगावर पडला तरी त्‍वचा जळते इतके हे धोकादायक असते

या झाडाचे नाव आहे मॅकेनील ट्री Manchineel Tree शास्त्रिय नाव आहे Hippomane mancinella, याला इंगजीत Beach Apple, Death Apple म्हटले जाते.

हे प्रामुख्याने कॅरिबियन बेटांवर तसे मध्य व दक्षिण अमेरिकेत आढळते. प्रामुख्यने समुद्र किनारी भागातच याची उगवन होते.

हे जगातलं सर्वात विषारी झाड आहे कारण याचे फळ दिसायला सफरचंदासारखं आकर्षक दिसतं पण: खाल्लं तर तीव्र उलटी, रक्तस्राव होऊन माणसाचा थेट मृत्‍यू होतो.

धूरही धोकादायक असतो याचे लाकूड जाळलं तरी विषारी वायू तयार होतो. डोळ्यात गेला तर कायमचे अंधत्‍व येते.

या झाडातून पांढरा दुधासारखा (रस चिक)बाहेर येतो, हा रस त्वचेला लागला तर फोड येतात जखमेत गेला तर गंभीर विषबाधा होते.

फक्त इग्वाना या सरड्याला याचे विष पचते हा एकमेव प्राणी या झाडाचे फळ खातो. त्याच्यावर कोणत्याही विषाचा परिणाम होत नाही

अनेक देशांत या झाडाच्या खोडावर लाल पट्टी मारलेली असते किंवा धोक्याची सूचना दिलेली असते.