The Kerala Story पाहणाऱ्यांना संरक्षण मिळावे, सुप्रीम कोर्टात जनहित याचिका | पुढारी

The Kerala Story पाहणाऱ्यांना संरक्षण मिळावे, सुप्रीम कोर्टात जनहित याचिका

पुढारी ऑनलाईन डेस्क : द केरल स्टोरी संदर्भात रोज नवनवे अपडेट्स समोर येत आहेत. आता या चित्रपटासंदर्भात आणखी एक अपडेट आली आहे. (The Kerala Story) ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट पाहू इच्छिणाऱ्या आणि चित्रपट प्रदर्शित करू इच्छिणाऱ्या मल्टिप्लेक्समधील लोकांना संरक्षण मिळावे. यासाठी तातडीने आवश्यक पावले उचलण्याची मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. नव्या याचिकेत चित्रपटावरील बंदी उठवण्याची मागणी करण्यात आली आहे. कारण बंदी लागू केल्याने अशा राज्यात हिंसाचार आणि अशांतता निर्माण होत आहे, असे म्हटले आहे. (The Kerala Story)

एकीकडे काही राज्य़ांत हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. तर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आलीय. याविरोधात चित्रपट निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे, यावर आज सुनावणी होईल.

Back to top button