नाशिक : चांदवडला एकाच रात्री चार मंदिरांत चोरी
![मंदिरात चोरी, www.pudhari.news](https://d2n2y7fp2ncdvv.cloudfront.net/files/2022/01/22122804/mandir-danpeti.jpg)
नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील वरचेगाव, गुजराथ गल्ली व नेमीनगर येथील तीन जैन मंदिर व सोमवार पेठेतील पगडी गणपती मंदिर ही चार मंदिरे चोरट्यांनी एकाच रात्रीत फोडत ६५ हजारांचा ऐवज लंपास केला. वरचेगाव येथील जैन मंदिरातील मुख्य मूर्तीच्या डोक्यावरील तीन थराचा ५० हजार रुपयांचा चांदीचा मुकुट, पाच हजारांचे चांदीचे फुले, पंचमुखी छत्रपालास असलेले सात हजाराचे चांदीचे मुकुट, दानपेटीतील रक्कम तीन हजार रुपये असा ६५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी नेला.
त्यानंतर चोरट्यांनी गुजराथ गल्ली, नेमीनगर परिसरातील जैन मंदिर व सोमवार पेठेतील पगडी गणपती मंदिर येथील दानपेटी फोडली. मात्र, या ठिकाणी चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. मंगळवार सकाळी दर्शनासाठी नागरिक आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चांदवडचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर, पोलिस उपनिरीक्षक सुरेश चौधरी आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.