Nashik | सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची बाळासह शेततळ्यात उडी

दोघांचाही मृत्यू; निफाड तालुक्यातील धक्कादायक घटना
water ponds
शेततळ्यात आपल्या दीड वर्षीय बाळासह उडी घेऊन विवाहितेने जीवन यात्रा संपविली. (छाया : दिपक श्रीवास्तव )
Published on
Updated on

निफाड : निफाड तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुक येथे राहणाऱ्या सुजाता भूषण निश्चित या 27 वर्षीय नवविवाहित महिलेने सासरच्या छळाला कंटाळून आपल्या दिड वर्षीय बाळासह शेततळ्यात उडी घेऊन जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी मयत सुजाता चे वडील रामकृष्ण गाजरे यांनी निफाड पोलीस ठाण्यात आपल्या मुलीला सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार नोंदविली आहे.

का घेतला टोकाचा निर्णय?

  • नवविवाहितेचा सासरी सातत्याने छळ केला गेला.

  • माहेरून पैसे आणावे, तसेच काम करत नाही, झोपून राहते अशा तक्रारी करत.

  • या त्रासाला कंटाळून सुजाताने टोकाचे पाऊल उचलले.

water ponds
दोन कोटी सोन्याची तस्करी करणाऱ्या संशयिताने नागपुरात संपविले जीवन

दीडवर्षाच्या चिमुकल्यासह शेततळ्यात उडी

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी रामकृष्ण प्रभाकर गाजरे यांची मुलगी सुजाता हिचा विवाह 19 जून 2019 रोजी सोनेवाडी बुद्रुक येथील भूषण निश्चित यांच्याशी झालेला होता. मात्र विवाह नंतर सातत्याने सासरी तिचा छळ केला गेला. माहेरून पैसे आणावे, तसेच काम करत नाही, झोपून राहते अशा वेगवेगळ्या कारणांनी सातत्याने तिला त्रास दिला जायचा. या त्रासाला कंटाळून सुजाता हिने दिनांक 25 जून 2024 रोजी रात्री च्या सुमारास त्यांच्या शेतातील शेततळ्यामध्ये आपला दीड वर्षाचा मुलगा गुरु भूषण निचीत याच्यासह उडी मारून जीवन संपविले. या शेततळ्यामध्ये पाणी भरलेले असल्यामुळे चांदोरी तालुका निफाड येथून आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात आले होते. या पथकातील स्वयंसेवक सागर गडाख बाळू आंबेकर, सुरेश शेटे, संतोष लगड आदींनी शेततळ्यामध्ये बुडालेल्या मायलेकाचे मृतदेह शोधून बाहेर काढले.

पती, सासू-सासरे यांच्यावर गुन्हा

पोलिसांनी मयत सुजाताचा पती, सासू-सासरे, दीर आणि जाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम आणि उपनिरीक्षक ईश्वर पाटील हे अधिक तपास करीत आहेत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news