विद्यार्थिनींना हिजाब आणि बुरखा परिधान करण्यास घातलेल्या बंदी विरोधात दाखल याचिका आज ( दि.२६) मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. ( Hijab Ban Challenge)
मुंबईतील चेंबूर परिसरातील महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थिनींना हिजाब आणि बुरखा परिधान करण्यास घातलेल्या बंदी विरोधात ९ विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायमूर्ती ए. एस. चांदुरकर व न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठानं फेटाळली. महाविद्यालयानं लादलेल्या या बंदीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत खंडपीठानं ही याचिका निकाली काढली. ( Hijab Ban Challenge)
चेंबूर येथील चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या एनजी. आचार्य व डी.के.मराठे महाविद्यालय प्रशासनाने मे महिन्यात विद्यार्थिनींना व्हॉटस अपद्वारे संदेश पाठवून कॉलेजमध्ये बुरखा, हिजाब व नकाब परिधान करण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे निर्देश दिले होते. . विद्यार्थिनींनी आपल्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होत असल्याचं नमूद करत वकील अल्ताफ खान यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयात १९ जून रोजी सुनावणी झाली होती. ( Hijab Ban Challenge)