पुणे ग्रामीण | बारामती तालुक्यात युरियाची कृत्रिम टंचाई

ऐन खरीप हंगामात शेतकर्‍यांची अडचण
Urea prices have been increased illegally in Baramati
बारामतीत बेकायदेशीर पद्धतीने युरियचे भाव वाढवण्यात आले आहेत File Photo
Published on
Updated on

शिर्सुफळ : बारामती तालुक्यात ऐन खरीप हंगामात युरियाची कृत्रिम टंचाई विक्रेत्यांनी निर्माण केली असून, युरियाची 266.50 रुपयांची बॅग अनेक जण 300 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त भावाने विकत आहेत. अनेक जण युरियाचे लिंकिंग करीत आहेत, त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे.

युरियाच्या एका बॅगची किंमत सर्व करासहित 266.50 रुपये आहे. परंतु, बारामती तालुक्यात शेतकर्‍यांकडून 300 रुपये वसूल केले जातात व युरियाबरोबर लिक्विड युरिया घेण्यासाठी सांगतात. एवढे करूनही उपकार केल्यासारखा युरिया देतात. खताच्या किमतीबाबत शेतकर्‍याने वाद घातला, तर विक्रेते युरिया उपलब्ध नाही, आम्ही विकत नाही, असे सांगतात. त्यामुळे शेतकर्‍यांना नाइलाजास्तव चढ्या दरात युरिया खरेदी करावा लागतो. विशेष म्हणजे, प्रत्येक हंगामातच कृषी विक्रेते युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करतात. त्यानंतर त्याची चढ्या भावाने विक्री करतात. यातून शेतकर्‍यांची मोठी आर्थिक लूट होत आहे.

Urea prices have been increased illegally in Baramati
Dhule News : इंदवे परिसरात युरिया खताची कृत्रिम टंचाई; शेतकऱ्यांची गैरसोय

शेतकऱ्यांची सरासर लूट

लिंकिंग युरिया विकत घेताना काही कृषी केंद्रचालक शेतकर्‍यांना इतर खते किंवा कीटकनाशक विकत घेण्याची सक्ती करतात. इतर खते अथवा कीटकनाशक खरेदी केले, तरच युरिया देतात. शेतकर्‍यांना केवळ युरियाची गरज; मात्र नाइलाजाने शेतकर्‍यांना युरियासोबत इतर उत्पादन विकत घ्यावे लागते. कृषी केंद्रचालकांच्या या लिंकींगवर कुणाचाही अंकुश नाही. बारामती तालुक्यात जिरायती भागात शिर्सुफळ, गाडीखेल, साबळेवाडी, पारवडी, उंडवडी, सिद्धेश्वर निंबोडी येथे यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सूनने वेळेवर हजेरी लावल्याने पिकांची पेरणी लवकर झालेली आहे.

कृत्रिम टंचाई करणे बेकायदेशीर आहे

खरीप हंगामात बाजरी, सोयाबीन, भुईमूग, तूर, कांदा, मका, पालेभाज्या तसेच उसाच्या बांधणीसाठी प्रामुख्याने युरियाची आवश्यकता असते. सध्या बाजरीच्या पेरणीला वेग आला आहे. शेतकर्‍यांना युरियाची आवश्यकता आहे. अनेक शेतकरी कृषी केंद्रात जाऊन युरियाबाबत विचारणा करतात. परंतु, युरिया उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. तालुक्यात काही दिवसांपासून युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. काही विक्रेते चढ्या दराने खताची विक्री करीत आहेत. याबाबत शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली असून, संबंधित विभागावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याबाबत कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. कृषी विभागाने याप्रकरणी दखल घेऊन काळाबाजार करणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर्षी जून महिन्यात परिसर व इतर परिसरात चांगला पाऊस झाला आहे. येथील सर्व शेतकर्‍यांनी बाजरी व इतर कडधान्य, ऊस लागवड केली आहे. यासाठी युरियाची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. कृषी विभागाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी.

दीपक आटोळे, शेतकरी. शिर्सुफळ

युरिया सर्व दुकानदारांना उपलब्ध करून दिलेला आहे. दोन दिवसांमध्ये युरियाचे आणखी रॅक येणार आहेत. तालुक्यात युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याची अथवा अधिक दराने विक्री होत असल्याची तक्रार शेतकर्‍याने केल्यास संबंधित विक्रेत्यावर कारवाई केली जाईल. कोणत्याही शेतकर्‍याने अधिक किंमत देऊन युरिया खरेदी करू नये. या क्रमांकावर पुराव्यासह तक्रार करावी 9158479306.

सुप्रिया बांदल, कृषी अधिकारी, बारामती

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news