Venkatesh Iyer : वेंकटेशची बॅट ‘तळपली’, सुहाना मनमुराद ‘थिरकली’! व्‍हिडिओ व्‍हायरल | पुढारी

Venkatesh Iyer : वेंकटेशची बॅट 'तळपली', सुहाना मनमुराद 'थिरकली'! व्‍हिडिओ व्‍हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रविवारी ( दि. १६ ) झालेल्या सामन्यात व्यंकटेश अय्यरने केकेआरसाठी तब्बल १५ वर्षांनी शतक झळकावले. ‘केकेआर’कडून शतक झळकवणारा वेंकटेश हा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या शतकानंतर सुहाना खानने खास सेलिब्रेशन केले. तिने प्रेक्षक गॅलरीमध्ये डान्स देखील केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आयपीएल स्‍पर्धेत रविवारी झालेल्‍या सामन्‍यात मुंबई इंडियन्सच्या धारदार गोलंदाजीसमोर केकेआरचे इतर फलंदाज धावांसाठी झगडत होते. तर दुसरीकडे वेंकटेश अय्यर एकाहाती किल्‍ला लढवत होता. त्‍याने संघाच्‍या डावाला आकार दिला. वेंकटेशने ४९ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. वेंकटेश अय्यर आयपीएल २०२३ च्या हंगामात शतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी सनरायजर्स हैदराबादचा खेळाडू हॅरी ब्रूकने यंदाच्‍या मोसमातील पहिले शतक झळकावले होते. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सकडून शतक झळकावणारा वेंकटेश दुसरा खेळाडू ठरला आहे.

सुहाना खानची वेंकटेशच्‍या खेळीला भरभरुन दाद

अय्यरने आपल्या खेळीत ९ षटकार आणि ५ चौकार मारले. आयपीएल २०२३ च्या हंगामात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. हा सामना पाहण्यासाठी अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान उपस्‍थित होती. वेंकटेशच्या शतकानंतर तिने एकच जल्‍लोष केला. अय्‍यरचे शतक पूर्ण झाल्‍यावर तिने नाचत आणि टाळ्या वाजवत आपला आनंद साजरा केला. सुहानाचा हा व्‍हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्‍हायरल होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button
प्राजक्ता खुलली साडीत; पाहा प्राजक्ताचे सुंदर फोटो OSCAR Award : ब्लॅक ड्रेसमध्ये दीपिकाचा जलवा आई कुठे काय करते फेम रुपाली भोसलेचे हटके फोटो प्रियंकाचे व्हाईट ड्रेसमधील ग्‍लॅमरस फोटो वयात काय ठेवलंय! ऐश्वर्या नारकरच्या अदा पाहून वय विसरून जाल रश्मिका बनली क्रिकेटर्सची क्रश; नेटकरी म्हणताच…. व्हाईट शॉर्ट वनपीसमध्ये हॉट झाली मौनी रॉय सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस ठरली रुपाली भोसले अनन्याने हॉट फोटोशूट करत उन्हाळ्यात वाढवला आणखी उष्मा बोल्ड आणि बिनधास्त सई