

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज आयपीएलमध्ये दुसऱ्या सत्रात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स आमने सामने आहेत. हा सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान, गुजरात संघ फलंदाजीसाठी उतरला आणि पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टने कमाल दाखवली. ट्रेंट बोल्ट पावरप्लेमध्ये विकेट घेण्यासाठी ओळखला जातो. ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच षटकात वृद्धीमान सहाने षटकार मारण्याचा प्रयत्न केला.
मात्र, वृद्धीमान सहाने शॉट मारल्यानंतर चेंडू फार उंच गेला. तो खेळपट्टीवरच अतिशय उंच गेला होता. हा झेल पकडण्यासाठी राजस्थानचे तीन खेळाडू एकाच ठिकाणी आले. यष्टीरक्षक आणि कर्णधार संजू सॅमसन, हेटमायर आणि राजस्थानचा आणखी एक खेळाडू झेल पकडण्यासाठी एकाच ठिकाणी आले. त्यामुळे तिघांची धडक होऊन चेंडू सुटेल असे वाटत असतानाच गोलंदाज ट्रेंट बोल्ट तेथे पोहचला आणि तिघांच्या झालेल्या धडकेतून बाहेर पडलेला चेंडू ट्रेंट बोल्टच्या हातात पडाला. ट्रेंट बोल्टने पकडलेल्या या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.