जिल्हा परिषदेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी तीन कोटी | पुढारी

जिल्हा परिषदेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी तीन कोटी

पुणे, पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषदेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 3 कोटी 34 लाख 6 हजार 181 रुपयांचा निधी देण्यात आला आहे. पंधराव्या वित्त आयोगातून हा निधी उपलब्ध झाला आहे. तीस केंद्रांमधील इमारतींचे नूतनीकरण, दुरुस्तीच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे.

प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या आरोग्य केंद्रांच्या कामांबाबतचे तत्काळ अंदाजपत्रक तयार करावे आणि या अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता घ्यावी, असा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आळंदी, चाकण (दोन आरोग्य केंद्र), राजगुरुनगर (खेड), संगमवाडी डिस्पेन्सरी, वानवडी आणि परमार डिस्पेन्सरी, एम. बी. कॅम्प, देहूरोड, किन्हाई, देहूरोड, जुना नाका, देहूरोड,

मिरज पूर्वभागामध्ये काँग्रेसला उभारी कधी?

(कँटोन्मेंट बोर्ड), पूनमचंद मेघराज बोरा प्रसूतिगृह इमारत शिरूर, काचेअळी, (शिरूर), साळीअळी भाजी मंडई, सासवड, विरंगुळा केंद्र, हडको, सासवड, जेजुरी (पुरंदर), राष्ट्रसंत गाडगेमहाराज प्राथमिक शाळा क्रमांक 2, नवी अळी आरोग्य केंद्र, भोर, महाराणा प्रताप शाळा क्रमांक 1 आरोग्य केंद्र, भोर (भोर), ग्रामीण रुग्णालय, जुन्नर, अहिल्याबाई होळकर विद्यालय, जुन्नर (जुन्नर),

इंदापूर शहरातील दोन आरोग्य केंद्र, जळोची, अग्निशामक एरिया, बारामती, कसबा, रमाई माता भवन, आमराई (बारामती), तुंगार्ली शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र, लोणावळा, भांगरवाडी शाळा आरोग्य केंद्र, लोणावळा, तळेगाव दाभाडे, वाळवण शाळा आरोग्य केंद्र, लोणावळा (मावळ) आणि केंद्र शाळा क्रमांक 1 आरोग्य केंद्र, आळंदी म्हातोबाची (हवेली) यांचा समावेश आहे.

हेही वाचा

पणजी : जुने राजभवन होणार राष्ट्रीय स्मारक

घटना वाचविण्यासाठी एकत्र आले पाहिजे: डॉ. बाबा आढाव यांचे आवाहन

‘अग्निपथ’मधील तरुणांना नोकर्‍यांमध्ये आरक्षण

Back to top button