‘अग्निपथ’मधील तरुणांना नोकर्‍यांमध्ये आरक्षण | पुढारी

‘अग्निपथ’मधील तरुणांना नोकर्‍यांमध्ये आरक्षण

पणजी : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेत सहभागी होणार्‍या गोव्यातील तरुणांना नोकर्‍यांमध्ये आरक्षण ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी केली.

केंद्र सरकारने चार वर्षे सैन्यदलात काम करण्याची अग्निपथ नावाने योजना जाहीर केली आहे. त्या योजनेनुसार गोव्यातील जे तरुण तरुणी सैन्यात चार वर्षे काम करतील, त्यांना गोव्यात पोलिस, अग्निशामक दल व वन खाते यामध्ये काही जागा यापुढे राखीव ठेऊन कायमस्वरुपी नोकर्‍या दिल्या जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

पणजी येथे भाजपच्या बैठकीत डॉ.सावंत म्हणाले की देशातील तरुण तरुणीना सैन्यात काम करण्याची संधी मिळावी यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजना जाहीर केली आहे. चार वर्षे सैन्याच्या विविध भागात काम करणार्‍यांना भरपूर मोबदला मिळणार असून 20 टक्के युवकांना सैन्यात घेतले जाईल. अशी ही योजना आहे.

मुख्यमंत्र्याचे बनावट व्हॉट्स अ‍ॅप

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावे बनावट व्हॉट्स अ‍ॅप अकाऊंट उघडून राजकारणी व नागरिकांना संदेश पाठवले जात असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली आहे. मुख्यमंत्र्याच्या नावाचा गैरवापर केल्याप्रकरणी सायबर पेलिसांनी अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

Back to top button